बल्लारपूर येथील 2 महिलावरील अत्याचारा विरोधात विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कॅण्डल मार्च (Candle march through various social organizations against sexual harassment of 2 women in Ballarpur)
बल्लारपूर :- दिल्ली पासून कोलकाता पर्यंत आणि बदलापूर पासून बल्लारपूर पर्यंत ज्या पुरुष वादी मानसिकतातून महिला आणि मुलींवर अत्याचार होत आहेत. त्याला वेळोवेळी पाठ राखण करण्याचे काम हे देशातील केंद्र सरकार करत आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे देशातील महिला आणि मुली अत्यंत असुरक्षित झालेले आहेत. दिवस, रात्र, रस्ता, मंदिर असो वा कार्यालय असो आज महिला स्वतःला कुठेही सुरक्षित आहेत असं म्हणू शकत नाही आणि ही महिला सुरक्षितता केंद्रामध्ये आलेल्या सरकारच्या महिला विरोधी धोरणांमुळे आहे. या देशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की, नाही असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये शेकडो पोलिसांना तैनात करून महिलांना असुरक्षित वातावरणामध्ये ठेवल्या जात आहे. ओयो सारख्या हॉटेल वाल्यांना अशा कुकर्मामधे सामील होण्यासाठी सरकारकडूनच प्रोत्साहन मिळत आहे की काय असे बल्लारपूरच्या घृणीत घटनेवरून दिसून येत आहे. हॉटेल वाल्यांना काही निती नियम आहेत की, नाही आणि सरकार म्हणून प्रशासनाचे काही नियंत्रण या सगळ्या व्यवस्थेवर आहे. की, नाही असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आज बल्लारपूरच्या महिलांना आणि समस्त बंधू-भगिनींना या सर्व अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून निदर्शने करावी लागत आहेत.
६ सप्टेंबर रोजी महिलांचा हा कॅन्डल आणि मशाल मार्च पेपरमिल तीन एक्का गेट बल्लारपूर वरून निघाला आणि बल्लारपूर शहराच्या मुख्य रस्त्यावरून रेल्वे स्टेशन चौकातून परत येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदना करीत या मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध समाजसेविका डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी बल्लारपूरकरांना महिला आणि एकूणच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शपथ दिली. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात बल्लारपुरातील महिला पुरुष युवक युवती यांनी भाग घेतला. यात प्रामुख्याने विवेक खुटेमाटे, ताहेर हुसैन, रोजिदा ताजुद्दीन, विजय मुसळे,करुणा शेगांवकर, शंकर काळे, अनीश खान, साजिद शेख, आनंदराव अंगलवार, सतीश मालेकर, श्रीकांत सुंदरगिरी, अजय शाह, शिवबच्चन राजभर, मुकद्दर खान, शाहीद शेख, मोहित शेख, अलविना शेख, ऍड. रोहिणी, अब्दुल आबिद, शकील खान, पूजा मोहुर्ले, तंजीला सैयद, संजीदा बाजी, एलेस नातर्गी, बशीर खान, आबिद खान, दीपक बानोत, यासिर खान, शाहिद खान, समीर शेख, अनिल कलवाला, अंजू, लता नागौसे, शबीर शेख यांच्याशिवाय हजारो बल्लारपूरकरांनी रॅलीमध्ये भाग घेतला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या