विसापूर : ओबीसींच्या जातनिहाय जनगणना करून न्याय हक्क मिळावा.या अनुषंगाने मंडल जनगणना यात्रा नागपूर येथून काढण्यात आली आहे. ही यात्रा सोमवार (५) आगस्ट रोजी सकाळी ९.४५ वाजता बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथे दाखल झाली.छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडल जनगणना यात्रा येताच विसापुरकरांनी जोरदार स्वागत केले. यावेळी यात्रेचे संयोजक उमेश कोर्राम यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. केंद्र सरकार ने जातीनिहाय जनगणना करावी. मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये.राज्य सरकार ने महाज्योती संस्थेला हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे तात्काळ सुरू करावी,आदी मागण्यावर केंद्र व राज्य सरकार ने निर्णय घेवून ओबीसींना न्याय मिळावा,म्हणून मंडल जनगणना यात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
या यात्रेचे सारथ्य मंडल जनगणना यात्रेचे संयोजक उमेश कोर्राम, सतीश मालेकर, कुणबी समाजाचे अध्यक्ष अड.पुरुषोत्तम सातपुते, डा.संजय घाटे, शंकर पाल,अशोक सरोदे, सुभाष उके आदी करीत आहे. या यात्रेचे विसापूर येथे आगमन झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, धोबी, परिट व वरठी समाजाचे शालिक भोजेकर, अशोक तुराणकर, तेली समाजाचे सुरेश इटनकर,डा.सुनील बुटले, चर्मकार समाजाचे उद्धव खंडाळे, सुभाष भटवलकर, कुणबी समाजाचे मधुकर भोयर, संजय डाहुले, नाभीक समाजाचे आर.एन.सुंदरगिरी, सुरेश पंदिलवार,आदिवासी समाजाचे लक्ष्मीकांत टेकाम, वासुदेव मेश्राम, वाल्मिकी समाजाचे बापुराव पारशिवे, सुतार समाजाचे मधुकर परसुटकर, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, विजय टोंगे, प्रभाकर कळस्कर, धनगर समाजाचे परशराम लोणारे आदी विसापुरकरांनी मंडल जनगणना यात्रेचे स्वागत केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या