बल्लारपूर कोठारी मार्गांवर ट्रकने दुचाकी स्वारास चिरडले, दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू (Bike rider crushed by truck on Ballarpur Kothari roads, bike rider died on the spot)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर कोठारी मार्गांवर ट्रकने दुचाकी स्वारास चिरडले, दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू (Bike rider crushed by truck on Ballarpur Kothari roads, bike rider died on the spot)


बल्लारपूर :- बल्लारपूर कडून गोंडपीपरी कडे दुचाकी क्र.एम.एच.33 ए ए 6584 ने जात असताना कोठारी जवळ आशिष बार अँड रेस्ट।रंट जवळ बैलबंडीला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिली व ट्रक सुसाट वेगाने पळून गेला. यात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला. दुचाकीस्वार हा चामोर्शी तालुक्यातील असल्याचे समजते. बल्लारपूरकडून गोंडपिंपरिकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास कोठारी येथे आशिष बार अँड रेस्टॉरंट जवळ राष्ट्रीय महामार्गावर आज दि. 4 ऑगस्टला साय. 6:00 वाजताच्या दरम्यान घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची नोंद कोठारीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी घेतली असून अपघात करून पसार झालेल्या ट्रकचा शोध कोठारी पोलीस घेत आहेत. सदर प्रकारची माहिती कोठारी पोलिसांना समजताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)