बल्लारपुर तहसील कार्यालयात शुरु असलेल्या भोंगळ कारभार यांच्या हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे वतीने जाहीर निषेध (Public protest on behalf of Helping Hands Foundation of Bhongal Karbhar started in Ballarpur Tehsil Office)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपुर तहसील कार्यालयात शुरु असलेल्या भोंगळ कारभार यांच्या हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे वतीने जाहीर निषेध (Public protest on behalf of Helping Hands Foundation of Bhongal Karbhar started in Ballarpur Tehsil Office)


बल्लारपूर : बल्लारपुर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा निषेध हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे वतीने केले. यावेळी उपविभागीय अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आला. या अनुषंगाने तहसिल कार्यालयात होत असलेला हेतुपुरस्सर विलंब व खालील दर्शवलेल्या कार्य त्वरीत अंबलबजवणी करण्यात यावें १) नियमांचे उल्लंघन करून खोटे फेरफार बंद करणे, २) 31 व 31/1 व इतर पोट हिस्सा जागाचा निकाल मार्गी लावने, ३) काल मर्यादाचा कठोरात्मक पालन करणे, ४) लोकां सोबत दुरव्यवहार बंद करणे, ५) कामाला दिरंगाई करुन जानून बुजुन प्रलंबित ठेवूने बंद करणे,६) लोकासोबत दुरव्यवहार बंद करणे, ७) कामास विलम्ब हेतु पुरस्कर दुर्लक्ष बंद करणे,८) कर्तव्य पालनात कसूर बंद करणे, ९) शिस्त भंग आणी लापरवाही बंद करणे, १०) नियमाचे उल्लंघन करुण खोटे फेरफार बंद करणे.

 
         यांच्या अगोदर संदर्भीय पत्रान्वये दिनांक 17.05.2023 रोजी आपण पोलीस निरिक्षक श्री. उमेश पाटिल यांच्या समक्ष तहसिलदार साहेब अजय चरडे सर्व प्रकरण 3 ते 4 महिन्यास कार्यवाही पूर्ण करण्यास येणार असल्याचे चर्चे दरम्यान करण्याची हामी दिली होती ती अदयावत प्रलंबित असुन कसूर व्यक्तिंवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी व सर्व प्रकरण दिलेला शब्दा प्रमाणे मार्गी लावण्यात यावी अन्यता आंदोलन तीव्र करण्यात येईल. अशी मागनी हेल्पिंग हैन्डस फाऊंडेशनचे ट्रस्ट फाउंडर अध्यक्ष प्रकाश दोतपेल्ली यांच्या नेतृत्वाखाली श्रीनिवास चेरकुतोटा, संजय मुप्पीड वार, मनोहर दोतपेल्ली, आनंदराव मातंगी, रंगय्या अड्डुरवार, प्रेमकुमार अरकिल्ला, नितिन सोयाम, शुभम शेटिये, जय दोतपेल्ली, शुभम नंदगीरवार, करण कामटे, प्रवीण दसारपू, अजय दासरवार, वैभव धरनिवार, शंकर साटलावार, विनोद साटलावार, पुल्लुरी बालाय्या, रोशन दुर्गे आदि उपस्थित होते

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)