चंद्रपूरात भरदिवसा गोळीबार, बिनबा गेट परिसरातील हॉटेल मध्ये एकाव्यक्तीचा गोळीबारात हत्या (Daylight firing in Chandrapur, one person was killed in a hotel in Binba Gate area)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात भरदिवसा गोळीबार, बिनबा गेट परिसरातील हॉटेल मध्ये एकाव्यक्तीचा गोळीबारात हत्या (Daylight firing in Chandrapur, one person was killed in a hotel in Binba Gate area)


चंद्रपूर :- मागील काही दिवसापासून चंद्रपुरात सातत्याने गोळीबाराच्या घटना होत आहेत. अवैद्य धंद्याचे माहेरघर असलेल्या आणि कोळसा तस्करीत डॉन समजणाऱ्या नकोडा येथील उपसरपंच असलेले हाजी सरवर शेख यांची आज दिवसाढवळ्या चंद्रपूर शहरातील बिंनबा गेट परिसरामध्ये असलेल्या शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना 5 ते 7 अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्याने गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जुन्या वादातून हाजी सरवर शेख याच्यावर आरोपींनी आपल्या बंदुकीतून गोळ्यांच्या फायरीग केल्या विशेष म्हणजे हाजी सरवर शेख यांची नुकतीच कारागृहातून सुटका झाल्याचे कळते, हाजी सरवर शेख यांची मागील पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून अवैध कोळसा व्यापारात त्याचा फार मोठा दरारा होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. गुन्हेगारीतला बादशहा म्हणून त्याची ओळख ही होती. त्यामुळे चंद्रपुरातील वाढत असलेल्या गुन्हेगारीतील एक मोठं नाव समाप्त झाल्याचे बोलल्या जात आहे. हाजी सरवर शेख हत्या जुन्या वादातून झाल्याचे सांगितले जात आहे. या हत्येनंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी घटनास्थळाची पाहणी करून हाजी सरवर शेख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करू असे यावेळी सांगण्यात आले होते. पुढील तपास शहर पोलीस करीत असून सुरू आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)