महात्मा फुले महाविद्यालय मध्ये एनसीसीच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिवस व रेड रिबन क्लब ची स्थापना व एचआईवी/ एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन (Establishment of International Youth Day and Red Ribbon Club and organization of HIV/AIDS Awareness Rally in Mahatma Phule College.)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालय मध्ये एनसीसीच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिवस व रेड रिबन क्लब ची स्थापना व एचआईवी/ एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन (Establishment of International Youth Day and Red Ribbon Club and organization of HIV/AIDS Awareness Rally in Mahatma Phule College.)


बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय युवा दिवस व रेड रिबन क्लब ची स्थापना करण्यात आली. हा कार्यक्रम 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, ग्रामिण रुग्णालय बल्लारपूर च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. तसेच शहरात एच आई वी/ एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. युवकां मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवसा निमित्ताने एचआईवी/ एड्स जागृती करणे व महाविद्यालयात रेड रिबीन क्लब व एनसीसी पथक ची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण सर होते तर म्हणून मुख्य वक्ते म्हणून श्री. सचिन तल्लार समुपदेशक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, डॉ विनय कवाडे, स्मिता काकडे आणि श्रुती तल्लार एनसीसी अधिकारी लेफ्ट प्रा योगेश टेकाडे ई ची विचारमंचा वर उपस्थित होते.

 
        कार्यक्रमाचे मुक्त मुख्य वक्ते श्री. सचिन तल्लार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि रेड रिबीन क्लब चे महत्त्व तसेच त्याचे कार्य युवकांनी एच आई वी आणि एड्स पासून कसे सुरक्षित राहावे. आपण युवक म्हणून कसे समाजात या विषयी जागृती निर्माण करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले.    डॉ. कवाडे आणि श्रुती तल्लार यांनी देखील यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. बी डी चव्हाण यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्ट. प्रा. योगेश टेकाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट पायल कुंदलवार, तर आभार कॅडेट साक्षी पुंजारी यांनी मानले. या कार्यक्रमात प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे मॅडम, प्रा स्वप्नील बोबडे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. पंकज कावरे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा विभावरी नखाते मॅडम इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच मोठया संख्येत एनसीसी कॅडेट्स आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)