बल्लारपुर पोलीसांनी १२ तासाचे आत जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या (Ballarpur police arrested 3 accused of forced theft within 12 hours)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपुर पोलीसांनी १२ तासाचे आत जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या (Ballarpur police arrested 3 accused of forced theft within 12 hours)


बल्लारपूर :- उल्लेखनीय कामगिरी अशी की, पोलीस ठाणे बल्लारपुर गुन्हा रजि.क्रं. ७६७/२०२४ कलम- ३०९ (४), ३ (५) भारतीय न्याय संहिता - २०२३ चे गुन्हा नोंद झाल्याने पोलीस निरीक्षक सुनिल वि. गाडे यांनी तपास टिम तयार करुन आरोपीचा शोध घेण्याचे सुचना दिल्याने. डि.बी. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी कसोशीने प्रयत्न करुन आरोपी नामे-१. जुबेर झाकीर हुसैन वय - २३ वर्षे व्यवसाय- मजुरी रा. साईबाबा वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. २. इकरीमा फिरोज शेख चय - २१ वर्षे व्यवसाय मजुरी रा. साईबाबा वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. ३. करण तुळशीदास जिबणे वय-२२ वर्षे व्यवसाय-मजुरी रा. आंबेडकर वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. यांना अटक करुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला - १) आरोपी नामे- जुबेर हुसैन याचे ताब्यातुन नगदी ८०००/-रु, रोख व फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल. २) आरोपी नामे ईकरीमा शेख यांचे ताब्यातुन नगदी ९९००/-रु. रोख. ३) आरोपी नामे करण जिवणे यांचेकडुन त्याचा गुन्हयात वापरलेला ज्यावर आरोपीने फिर्यादीचे मोबाईल मधील कि.५१,०००/-रु. ट्रॉन्सफर केले होते तो मोबाईल कि.अं. १०,०००/-रु. असा एकुण-३७,९००/-रु. मुदेदेमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनिल वि.गाडे, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, सफौ. गजानन डोईफोडे, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. रणविजय ठाकुर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, वशिष्ठ रंगारी, शरदचंद्र कारुष, मिलींद आत्राम, शेखर माथनकर, श्रिनिवास वाभिटकर, हितेश लांडगे इ, स्टॉफ यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)