भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने येत्या 15 ऑगस्ट पासून हर घर संविधान, घर घर संविधान अभियान (On the occasion of Amrit Jubilee year of Indian Constitution, Har Ghar Constitution, Ghar Ghar Constitution Campaign from 15th August)

Vidyanshnewslive
By -
0
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने येत्या 15 ऑगस्ट पासून हर घर संविधान, घर घर संविधान अभियान (On the occasion of Amrit Jubilee year of Indian Constitution, Har Ghar Constitution, Ghar Ghar Constitution Campaign from 15th August)

बल्लारपूर :- २६ नोव्हेंबर २०२४ ला संविधान दिनाला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने हर घर संविधान घर घर संविधान अभियान ची सुरुवात १५ ऑगस्ट २०२४ ला बल्लारपूर शहरातून होणार आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत, संपूर्ण बल्लारपूर तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, जे २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत चालतील. वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका व शहर तर्फे आयोजित हर घर संविधान, घर घर संविधान अभियान ची सुरुवात १५ ऑगस्ट पासून करणार आहेत. या काळात संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, रॅली आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील. कार्यक्रमात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. अभियानाचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत भारतीय संविधानाचे महत्व पोहोचवणे आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याचे महत्व नागरिकांना पटवून देणे आहे. सर्वांना या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून संविधानाचे महत्व आणि त्याचे पालन करण्याची जाणीव प्रत्येकाला होईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)