धक्कादायक ! चिचपल्ली जवळ रेल्वेच्या धडकेत एका अस्वलाचा मृत्यू, मागील 13 दिवसात 4 अस्वलींचा मृत्यू झाल्याच्या घटना (Shocking! One bear killed in train collision near Chichpally, 4 bear deaths in last 13 days)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! चिचपल्ली जवळ रेल्वेच्या धडकेत एका अस्वलाचा मृत्यू, मागील 13 दिवसात 4 अस्वलींचा मृत्यू झाल्याच्या घटना  (Shocking! One bear killed in train collision near Chichpally, 4 bear deaths in last 13 days)


चंद्रपूर :- वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या रेल्वे रुळावर वन्यजीवंचे अपघात सुरूच आहे. मागील १३ दिवसात ४ अस्वलीचा मृत्यू होणे ही फार दुर्दैवी घटना घडत असून रेल्वे प्रशासन कुठल्याही प्रकारची उपशमन योजने संदर्भात साधा शब्द काढायला तयार नाही. रेल्वे प्रशासनानी सहकार्याची भूमिका सुद्धा दाखवत नसल्याचे हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे यांनी सांगितले. वनविकास महामंडळाच्या चिचपल्ली- जुनोना वनक्षेत्रात हि घटना घडली असून येथे नेहमीच वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. लोहार जंगलातील १९ जुलैची रेल्वे अपघातात अस्वलीचा मृत्यूची घटना ताजी असतांना पुन्हा त्याच रेल्वे रुळावर चिचपल्ली येथे अस्वलीचा रेल्वेच्या अपघातात मृत्यू झाला, तर अर्जुनी मोरगाव क्षेत्रात २ अस्वलीचा मृत्यू झाला होता. चिचपल्ली स्टेशन जवळ एका नर अस्वलीचा रेल्वे च्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बल्लारशाह- गोंदिया रेल्वे रुळावर १३ दिवसात ४ अस्वलीचा मृत्यू झाले.
             ताडोबा- अंधारी लागतच हा भाग असून कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड- कऱ्हांडला यांचा हा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग आहे, अति महत्वाचा भ्रमणमार्ग असतांना वन्यजीवांचे मृत्यू न रोखणे हि लाजिरवाणी बाब आहे. कुठल्याही उपाय योजना न करणे, जंगलातून वेळेची बचत करण्यासाठी एक्सप्रेस सोडणे, जंगलातून वेगाची मर्यादा न राखणे हे वन्यजीवांच्या मृत्यू चे कारण ठरत आहे. असे हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी चे दिनेश खाटे यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाला बल्लारशाह- गोंदिया या जंगल परिसरातून एक्सप्रेस बंद करण्यात यावी. रात्री वेग मर्यादेचे पालन करावे जे आता रेल्वे प्रशासन करत नाही आहे. रात्री शक्यतो रेल्वे बंद करण्यात याव्या, जेणेकरून वन्यजीवांचे अपघाताला आला बसेल, अशी मागणी  हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)