वर्ध्यात evm बिघाडीचा खासदारांना फटका, मतदान करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली (MPs hit by evm failure in Wardha, had to wait to vote)

Vidyanshnewslive
By -
0
वर्ध्यात evm बिघाडीचा खासदारांना फटका, मतदान करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली (MPs hit by evm failure in Wardha, had to wait to vote)
वर्धा :- तांत्रिक कारणामुळे ईव्हीएम मध्ये बिघाडी उद्भवल्याने खुद्द खासदार यांना रांगेत सुमारे पाऊण तास रांगेत ताटकळत उभे राहण्याची घटना समोर आली आहे. यशवंत कन्या शाळेतील केंद्र क्रं.185 वर मतदान करण्यासाठी विद्यमान खासदार रामदास तडस हे सकाळी 7 वाजता सहपरिवार आले. खा. तडस यांनी आपल्या प्रतीक्षा क्रमांकानुसार मतदान केल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 5 30 ला मशीनमध्ये दोष आढळून आला आणि मतदान सुरु होण्याची 7 वाजताच्या वेळेपर्यंत ईव्हीएम मात्र सुरु होऊ शकले नाही. परंतु मशीन बंद मुळे त्यांना तब्बल पाऊण तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे निवडणूक यंत्रणेशी संबंधित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. शेवटी 7.45 ला तांत्रिक दुरुस्ती होऊन मतदान सुरु झाले. त्यामुळे उपस्थित मतदारांमध्ये काही काळासाठी रोष निर्माण झाला. मतदारांच्या रांगेत सुद्धा वाढ झाल्याने प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाला होता.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)