शासनाने त्या जाचक नियम व अटी त्वरित मागे घ्यावा - राजू झोडे (Govt should withdraw those oppressive rules and conditions immediately - Raju Zode)

Vidyanshnewslive
By -
0
शासनाने त्या जाचक नियम व अटी त्वरित मागे घ्यावा - राजू झोडे (Govt should withdraw those oppressive rules and conditions immediately - Raju Zode)
बल्लारपूर :- महाराष्ट्र सरकारने वयोवृद्ध व निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना अनंत काळापासून चालू असलेली योजना सुरू आहे. मात्र यावर्षी महायुति सरकारने वृद्ध वयोवृद्ध अपंग विधवा यांना त्रास देण्यासाठी जाचक नियम व अटी लावल्या आहेत यानुसार त्याना हयात प्रमाणपत्र सोबत बीपीएल क्रमांक अथवा इन्कम सर्टिफिकेट(उत्पन्नाचा दाखला) देणे बंधनकारक केले. याकरिता भर उन्हात तहसील कार्यालय व जुन्या बस स्थानक परिसरात असेलेले पटवारी कार्यालय येथे वृद्ध व अपंग लोकांच्या चकरा मारण सुरू झाल्या आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना रखरखत्या उन्हात फिरावं लागत असल्याने त्याच्या होणारा असह्य त्रासा मुले लाभार्थी संतप्त झाले आहे व तहसील कार्यालय मघ्ये लाभार्थीना नाहक त्रास देणे सुरू आहे या उन्हामघ्ये वयोवृद्ध, आजारी व दिव्यांगाना कमी जास्त झाल्यास तहसील प्रशासन जवाबदार राहतील त्याकरिता हा जाचक नियम व अटी त्वरित मागे घेतल्या नाही तर या विरोधात कांग्रेस व अन्य राजकीय पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करन्यात येईल असा इशाराचे नेते राजू झोडे यांनी दिला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)