बल्लारपूर शहरात एकाच रात्री चोरट्यानी दोन दुकाने फोडली, 2.70 लाख रु चोरी गेल्याची घटना उघडकीस (Thieves broke into two shops in Ballarpur city in one night, 2.70 lakh rupees were stolen.)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात चोरट्याने आपले चोरी करण्याचे सत्र पुन्हा सुरु केले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात असून या संदर्भात सूत्रांच्या माहितीनुसार बल्लारपूर शहरात एकाच रात्री शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या चष्माचे दुकान व त्याच परिसरात असलेले हार्डवेअर चे दुकान पहाटे च्या सुमारास फोडले असून दोन लाख सत्तर हजार रुपये चोरी केल्याची घटना २५ एप्रिल रोजी उघडकीस आली. येथील मुख्य मार्गावर सेंटर पॉइंट बार जवळ गुरूदयाल सिंग दिगवा यांच्या मालकीचे लक्की ऑप्टिकल व आय केअर दुकान असून त्यांच्या मुलाने २२ एप्रिल रोजी मनिपुरम गोल्ड लोन या बँकेतून सोने गहाण ठेवून ४ लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यातून त्यांच्या मुलाने १.३० लाख रुपये आपल्या कामासाठी खर्च केले होते. बाकीचे २.७० लाख रुपये दुकानाच्या ड्रावर मध्ये ठेवले होते अशातच पहाटेच्या सुमारास चोरट्याने अर्धवट शेटर उचलून ड्रावर मधील रक्कम चोरून लंपास झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरी करतांना चार व्यक्ती दिसत असून दोन चोर शटर उचलून आत मध्ये गेले. दुकानातील रक्कम लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तसेच यानंतर त्या चोरट्यांनी आपला मोर्चा बालाजी कॉम्प्लेक्स येथील विश्वकर्मा हार्डवेअर दुकानाचे शटर उचलून चोरी केली. त्यात फक्त ४५० रुपये चोरी गेले या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या