महाराष्ट्रात तिसरी आघाडी अस्तित्वात येणार का? मनोज जरांगे पाटला सह ओबीसी व वंचित मिळून तिसरी आघाडी होण्याची शक्यता, वंचितची पहिली यादी जाहीर (Will there be a third alliance in Maharashtra? Manoj Jarange Patla and OBC and Vanchit are likely to form a third alliance, the first list of the Vanchit has been announced)

Vidyanshnewslive
By -
0
महाराष्ट्रात तिसरी आघाडी अस्तित्वात येणार का? मनोज जरांगे पाटला सह ओबीसी व वंचित मिळून तिसरी आघाडी होण्याची शक्यता, वंचितची पहिली यादी जाहीर (Will there be a third alliance in Maharashtra? Manoj Jarange Patla and OBC and Vanchit are likely to form a third alliance, the first list of the Vanchit has been announced)
वृत्तसेवा :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण पूर्ण ढवळून निघालं आहे. बरेच नेते पक्षांतर करत असताना आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचंही टेन्शन वाढवणारी बातमी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मविआची साथ सोडली आहे. त्यामुळे आता ते स्वतंत्र लढणार याचं चित्र बुधवारी अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन आता तिसरी आघाडी वाढवणार आहे. याचं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी नवी खेळी खेळली असून तिसऱ्या आघाडीची नकळत घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मंगळवारी रात्री बैठक पार पडली. या बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.
          काहींनी घराणेशाही वाचवण्यासाठी वंचितचा वापर केला. गरीबांना अधिकाधिक उमेदवार देण्याचा आमचा मानस आहे. सर्वसामान्य जनतेला परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार हे 30 तारखेनंतर देणार असं त्यांनी जाहीर केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. बदलाचं राजकारण आणि नव्या आयामाची सुरुवात अशी आमच्या बैठकीत चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं वंचितला पूर्ण समर्थन आहे. ओबीसी, मुस्लीम आणि जैन समजाचे उमेदवार दिले जाणार आहे. 30 मार्चनंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करणार आहोत. जो गरीब आहे, गरजू आहे आणि ज्याला काही खरंच काहीतरी करायचं आहे अशा व्यक्तीला आम्ही उमेदवारी देऊ. जे आमच्यासोबत समझौता करायला तयार होते ते त्यांना आम्ही जरांगे पाटील फॅक्टर लक्षात घ्यावा असं म्हटलं होतं मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे आम्ही जरांगे आणि फारुक यांच्यासोबत चर्चा करुन काही निर्णय घेतले आहेत. बेरोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे प्रामुख्यानं लक्ष असणार आहे. शिवाय एग्रो इंडस्ट्रीवर लक्ष कसं द्यायचं हे आमचं मुख्य उद्दिष्टं असेल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)