नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल (General, Law and Order and Expenditure Inspectors will be available in the district for complaints from citizens)

Vidyanshnewslive
By -
0
नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल (General, Law and Order and Expenditure Inspectors will be available in the district for complaints from citizens)
चंद्रपूर : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तिनही निवडणूक निरीक्षक नागरिकांच्या सुचना / तक्रारी ऐकण्यासाठी वन अकादमी येथे उपलब्ध राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.  
सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून मध्यप्रदेशचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव लोकेशकुमार जाटव(मो.9404912593) हे नागरिकांचे मत, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी वन अकादमी येथील व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊस येथे त्यांचे कार्यालय ‘बकूळ’ येथे सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत उपलब्ध राहतील. कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक म्हणून केरळच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस अधिक्षक सुजीत दास (मो. 9307274907) हे वन अकादमी येथील व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊस येथील ‘शाल्मिक’ येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11 पर्यंत उपलब्ध राहणार आहेत. तर निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया (मो.9404921146) हे नागरिकांचे मत, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी ‘बकूल’ व्हीव्हीआयपी कक्ष, कौस्तुभ बिल्डींग, वन अकादमी येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)