चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडी कडून प्रतिभा धानोरकर तर महायुती कडून ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्यात लढत (Pratibha Dhanorkar from Mahavikas Aghadi from Chandrapur Lok Sabha constituency and from Mahayuti. Fight between Na. Sudhirbhau Mungantiwar)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडी कडून प्रतिभा धानोरकर तर महायुती कडून ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्यात लढत (Pratibha Dhanorkar from Mahavikas Aghadi from Chandrapur Lok Sabha constituency and from Mahayuti. Fight between Na. Sudhirbhau Mungantiwar)
चंद्रपूर :- चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेस च्या उमेदवारीला घेत अक्षरशः रान पेटविण्यात आलं होत. आमदार प्रतिभा धानोरकर यांची प्रबळ दावेदारी असतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्ष संधी देईल तर आपली लोकसभा निवडणूक लढवू, असे भाष्य केले होते. यानंतर त्यांची कन्या शिवानी यांनी युवा नेतृत्वाचा दाखला देत उमेदवारी मागितली. दरम्यानच्या काळात प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी डावलण्यासाठी पक्षातील अनेक नेत्यांना प्रोत्साहन देण्यात आले. चंद्रपूरातील हा वाद विकोपाला पोहचला. अनं उमेदवारीसाठी अनेकांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली. माध्यमांनी आलटून पालटून वडेट्टीवार, धानोरकरांना उमेदवारी मिळाल्याच्या बातम्या सूत्रांचा आधार घेत चालविल्या. यामुळे कार्यकर्त्यात कमालीचा संभ्रम निर्माण झाला.काँग्रेसच्या अनेक ग्रुपवर दोघांचेही समर्थक चांगलेच भिडले. अशात काँग्रेसची उमेदवारी नेमकी कुणाला मिळेल. याबाबत उत्सुकता ताणली होती. दरम्यान नुकतीच काँग्रेस पक्षाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. चंद्रपूरातील उमेदवारी प्रतिभा धानोरकरांना जाहीर करण्यात आली.विरोधकांचे "मनसुबे" गारद करीत धानोरकरांनी बाजी मारली. खासदार पती बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी संयम दाखवीत उभारीघेतली. गेल्या अनेक महिन्यापासून त्या लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाल्या होत्या. ओबीसीबहुल मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये असे काँग्रेस मधील विरोधकांसह भाजपच्या अनेकांना वाटत होते. पण शेवटी काँग्रेसने प्रतिभा धानोरकरांवर विश्वास दाखविला. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे तगडे भाजपचे उमेदवार समोर असतांना धानोरकरच त्यांना मात देऊ शकतात असा सुरु आता काँग्रेस गोटात उमटत आहे. त्यांना उमेदवारी जाहीर होताच आता काँग्रेस गोटात कमालीचा उत्साह पसरला आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)