बल्लारपुर :- 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवारीची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ ऍड अंजली साळवे यांनी नाकारली असून "मी महाविकास आघाडीच्याच उमेदवारा सोबत ठामपणे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुतीचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत धानोरकर व वडेट्टीवार यांच्यात रस्सीखेच सुरू असतांनाच अपक्ष उमेदवार म्हणून ओबीसी जनगणनेसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या डॉ ऍड अंजली साळवे यांना अपक्ष उमेदवारी देऊन चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याची ऑफर आली असल्याचे सूत्रांद्वारे कळले. तसेच चंद्रपूरच्या राजकारणात माजी आमदार स्व.एकनाथ साळवे यांचे कार्य असून डॉ अंजली साळवे या त्यांच्या पुतणी आहेत. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर जवळ असलेल्या बामणी गावच्या असून उच्च शिक्षित व सामाजिक कार्यासोबतच त्यांना राष्ट्रीय स्तरावर कामाचा अनुभव आहे. तसेच जिल्ह्यात कुणबी जातीची लोकसंख्या व डॉ ऍड अंजली साळवे यांनी ओबीसी जनगणने बाबत संसद, विधिमंडळ, न्यायालय व पाटी लावा अभियाना मार्फत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना अपक्ष उमेदवारी देऊ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र चंद्रपूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारीची ऑफर मी नाकारत असून देशात लोकतंत्र व संविधान सुरक्षित रहावे व महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी होऊ नये म्हणून मी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नसून महाविकास आघाडीच्याच उमेदवारा सोबत खंबीर पणे उभी राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ ऍड अंजली साळवे यांनी कळविले. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या