भारतात फेसबुक, इंस्टाग्राम अचानक होत आहेत लॉगआऊट ! नेमकं काय आहे कारण ? Facebook, Instagram are suddenly logout in India ! What exactly is the reason ?

Vidyanshnewslive
By -
0
भारतात फेसबुक, इंस्टाग्राम अचानक होत आहेत लॉगआऊट ! नेमकं काय आहे कारण ? Facebook, Instagram are suddenly logout in India !  What exactly is the reason ?
वृत्तसेवा :- सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमातून भारतातली तरुण पिढी गुंतलेली दिसून येते मग ते फेसबुक असो की इंस्टाग्राम असो की व्हाट्सअप व टेलिग्राम असो अशा विविध समाज माध्यमातून तरुण पिढी आपल्या भावना व्यक्त करते मात्र भारतात मागील 1 तासापासून फेसबुक व इंस्टाग्राम खाते आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक डाऊन आहे. याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही. इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले आहेत.
पुन्हा लॉगइन केल्यानंतर पासवर्ड नाकारल्या जात आहे. परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही. फेसबुकच्या होम पेजवर जाण्याऐवजी Facebook तुम्हाला आपोआप बाहेर काढेल.
तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसेल आणि तुम्ही परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जातील.लॉग आऊट परिणाम इंस्टाग्राम तसेच मेसेंजरवरही होत आहे. मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही. सध्या फक्त सेवा खंडीत आहेत. फेसबुक यावर अधिकृत उत्तर देणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)