बल्लारपूर - स्थानिक गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागात मान्यवरांच्या हस्ते केमिकल सोसायटीचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी .एम .बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी मंचावर नागपूर येथील कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. डब्ल्यू. बी .गुरनोले प्रमुख अतिथी होते. रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. बोडके तर रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. बोडके आणि केमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्राध्यापिका जे .व्ही .खोब्रागडे, यांची उपस्थिती होती. डॉ .गुरनोले म्हणाले, " रसायनशास्त्राचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे. संशोधन दृष्टीने अभ्यास करावा. आज जगात नॅनो पार्टिकल चे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. मानवी जीवनात याचे महत्त्वाचे स्थान आहे ." डॉ. बहिवार यांनी विज्ञानाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगून नवनवीन संशोधन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी समिती गठीत करण्यात आली असून वर्षभरात अनेक वैज्ञानिक उपक्रम राबविले जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तय्यबा ताहीर आणि उदसिया सिद्दिकी या विद्यार्थिनीने केले. तर आभार तीतीका चेंना या विद्यार्थिनीने मानले. याप्रसंगी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या