बल्लारपूरात " वर्तमान शैक्षणिक व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने व उपाय " या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन (Conducted orientation on "Present Education System and Challenges and Solutions faced by Students" at Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात " वर्तमान शैक्षणिक व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने व उपाय " या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन (Conducted orientation on "Present Education System and Challenges and Solutions faced by Students" at Ballarpur)
बल्लारपूर :- गौतमी महिला मंडळ द्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका, तसेच लोक कल्याणकारी संघर्ष समिती, तालुका बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर द्वारा राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मातोश्री रमाई यांच्या संयुक्त जयंती प्रित्यर्थ तसेच राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित भव्य जाहीर शैक्षणिक प्रबोधन मार्गदर्शन शनिवार रोजी दिनांक 13 जानेवारी 2024 ला सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका विद्यानगर बल्लारपूर येथे आयोजित केले आहे.
यानिमित्ताने वर्तमान शैक्षणिक व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने व उपाय (विशेषतः ग्रामीण, शोषित, वंचित मजूर वर्ग) या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शंभरकर राज्यशास्त्र विभाग प्रमुख सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, उद्घाटक व स्वागताध्यक्ष डॉक्टर विजय कळसकर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अनुप कुमार सर (संचालक नालंदा अकॅडमी वर्धा तथा माजी विद्यार्थी जे एन यु विद्यापीठ दिल्ली), एडवोकेट दीपक चटप सर, (आंतरराष्ट्रीय चेविंग स्कॉलर, चेविंग गोल्ड वालंटरिंग पुरस्कार विजेता लंडन) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या शैक्षणिक प्रबोधन सभेला हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती गौतमी महिला मंडळ द्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका तसेच लोककल्याणकारी संघर्ष समिती बल्लारपूर तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूरचे पदाधिकारी बुद्ध दास मेश्राम, गौतम कळसकर, प्रशांत बनकर, प्रभुदास देवगडे, रवी मेश्राम, विकास देशभ्रतार, बुद्धशील बहादे यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)