बल्लारपूरात आयोजित पहिले पुरोगामी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी महत्वपूर्ण सभा संपन्न (An important meeting was held for the success of the first Progressive Literature Conference organized in Ballarpur...)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात आयोजित पहिले पुरोगामी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी महत्वपूर्ण सभा संपन्न (An important meeting was held for the success of the first Progressive Literature Conference organized in Ballarpur...)
बल्लारपूर :- दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी बल्लारपूरात पहिले पुरोगामी साहित्य संमेलन आयोजित केले आहे...हे संमेलन यशस्वी करण्यासाठी पूर्व तयारी म्हणून स्थानिक श्री मंगल कार्यालय, बल्लारपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव निलेश ठाकरे, विशेष अतिथी म्हणून पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष इंजि.राकेश सोमाणी, जेष्ठ बालरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यां डॉ.अभिलाषा गावतूरे मॅडम, पुरोगामी साहित्य संसदेच्या विदर्भ अध्यक्षा मा.एड.योगिता रायपूरे मॅडम्, साहित्य संसदेचे जिल्हा निमंत्रक रंगशाम मोडक, पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुजय वाघमारे यावेळी विचार मंचावर उपस्थित होते. या वेळी, एड,प्रियंका चव्हाण, विशाल डुंबेरे, आशु वनकर, भारती डुंबेरे, अजय चव्हाण इत्यादींनी संमेलन यशस्वी करण्या संबंधी आपले विचार मांडले..एड.योगिता रायपूरे, डॉ.अभिलाषा गावातूरे, इंजिनियर राकेश सोमाणी यांनी आपले महत्वपूर्ण विचार मांडत कार्यक्रमासाठी लागेल ती मदत करण्याचे अभिवचन दिले.सुजय वाघमारे यांनी कार्यक्रमांस शुभेच्छा देत कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.कवी, साहित्यिक रंगशाम मोडक यांनीही आपले विचार मांडले...अध्यक्षीय भाषणात खेडेकर यांनी सर्वांनी एकजूट होऊन हे पहिले पुरोगामी साहित्य संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन केले. सभेला कार्यकर्त्यांनी दिलेला प्रतिसात बघता हे पहिले पुरीगामी साहित्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला...ही सभा यशस्वी करण्यासाठी नरेंद्र सोनारकर, विशाल डुंबेरे, नरेंद्र पिंगे यांनी परिश्रम घेतले...पुरोगामी साहित्य संमेलनाचे प्रमुख नरेंद्र सोनारकर यांनी सर्व अतिथी आणी उपस्थितांचे आभार मानत सर्व सामाजिक, साहित्यिक संघटनांनी या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)