वस्तीविभाग व नगर परिषद जोडणारा गोल पूल रेल्वेच्या तिसऱ्या लाईनच्या कामामुळं 11 दिवसाकरिता बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन (Round bridge connecting the settlement and city council is closed for 11 days due to the work of the third line of the railway, appeal to use alternative route)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- नागपूर ते काझीपेठ स्थानकापर्यंत तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळेच वस्ती परिसराला बल्लारपूर शहराच्या इतर भागाशी जोडणाऱ्या गोल पुलावर तिसरी लाईन टाकण्यासाठी काम सुरू आहे. त्यामुळे मध्यरेल्वेने 16 ते 26 जानेवारी या कालावधीत गोल पुलावरून सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे वस्ती विभाग परिसरात राहणाऱ्या 30 हजारांहून अधिक लोकसंख्येच्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीचा सामना करावा लागत असून त्रास वाढल्या आहे. वस्ती विभाग परिसरात 10 हुन अधिक शाळा असून, त्यात पाच हजारांहून अधिक मुले शिक्षण घेतात. यातील अनेक मुले वस्ती बाहेरून आल्याने त्यांचा शाळेत जाण्याचा त्रास वाढला आहे. तसेच वेकोलिच्या दोन खाणी वस्ती परिसरात असून, येथे दररोज हजारो कामगार बाहेरून येत असल्याने त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. गोल पूल बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना 5 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे, या परिस्थितीत त्यांना आता बीटीएस प्लॉट, वेकोली साई मंदिरमार्गे वस्ती येथे जाणे येणे करावे लागेल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)