Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे केंद्र व राज्य सरकाराचा निषेध आंदोलन. (Uddhav Balasaheb Thackeray's Shiv Sena group protest protest against central and state government in Ballarpur)

बल्लारपुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे केंद्र व राज्य सरकाराचा निषेध आंदोलन. (Uddhav Balasaheb Thackeray's Shiv Sena group protest protest against central and state government in Ballarpur)
बल्लारपूर :- काल सायंकाळी 10 तारखेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तर्फे शिवसेना पक्षाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता देण्याचे निर्णय जाहीर केल्याने संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा तर्फे निषेध प्रदर्शने करण्यात येत आहे. आज दिनांक 11 तारखेला रोजी गुरूवारी बल्लारपुर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जाहिर करण्यात आलेला निर्णय लोकशाही ला काळीम फासणारा  असुन या निर्णयाचा विरोधात  उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक सिक्की यादव यांच्या पुढाकारात पोलिस स्टेशन बल्लारपुर परिसर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी सिक्की यादव यांनी केंद्र सरकारच्या दबावाखाली निर्णय देण्याचा इशारा करत हा निकाल लोकशाही चा गळा दाबण्याचा असून केंद्र व राज्य सरकारची हुकुमशाही चा विरोध केला.
        या आंदोलनात प्रामुख्याने तालुका प्रमुख प्रकाश पाठक, शहर अध्यक्ष बाब शाहू युवासेना तालुका समन्वयक प्रदीप गेडाम, सह महिला आघाडी च्या विधानसभा समन्वयक कल्पना गोरघाटे, उप जिल्हाप्रमुख सुवर्णा मुरकुटे, तालुका प्रमुख मीनाक्षी गलघट, शहर अध्यक्षा ज्योती गेहलोत सह माजी नगरसेवक प्रभाकर मुरकुटे, उप शहर प्रमुख शेख युसूफ, आनंद हनमंत्तु, बॉबी कादासी, मंगेश जुनघरे, उप तालुका प्रमुख सतीश पाटणकर, युवासेनेचे गोरव नाडमवार, मनिष गोरघाटे, अनिकेत बेलखोडे, सोनु श्रीवास, आदित्य सिंह, यादव, सह अनेक कार्यकर्ता हजर होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या