केंद्र सरकारकडून मोठी घोषणा, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने निमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी जाहीर (A big announcement from the central government, a half day holiday has been announced on January 22 on the occasion of the inauguration of the Ram temple)

Vidyanshnewslive
By -
0
केंद्र सरकारकडून मोठी घोषणा, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने निमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी जाहीर (A big announcement from the central government, a half day holiday has been announced on January 22 on the occasion of the inauguration of the Ram temple)
वृत्तसेवा :- 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात उत्सुकतेचे वातावरण आहे. प्रत्यक्ष अयोध्येमध्ये राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हंटले आहे की, कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत असलेली भावना आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेली विनंती विचारात घेऊन सरकारने या दिवशी अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. या दिवशी शाळा महाविद्यालये ही अर्धा दिवसच सुरू राहतील. दरम्यान, राम मंदिरा मध्ये होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांकडून माहिती घेतली आहे. तसेच या दिवशी दिवाळीसारखा उत्सव साजरा झाला पाहिजे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त संपूर्ण देशभरात सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये २२ जानेवारी रोजी दुपारी अर्धा दिवस सुट्टी असेल. राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी घरोघरी पणत्या लावण्याचे आणि गरिबांना भोजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच २२ जानेवारीनंतर आपापल्या लोकसभा मतदार संघातील भाविकांना ट्रेनच्या माध्यमातून अयोध्येला पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)