बल्लारपूर लगतच्या विसापूर येथील हत्या प्रकरणात 1 व्यक्तीस अटक, बल्लारपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई (1 person arrested in murder case in Visapur near Ballarpur, Ballarpur police and local crime branch joint operation)
चंद्रपूर :- विसापुर येथे शिवाजी चौक, वार्ड क्र 01, विसापुर येथे सचीन भाउजी वंगणे वय 40 वर्ष रा. वार्ड क्र 01 विसापुर ता. बल्लारपूर या इसमाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने मारलेले आहे या माहितीवरून घटनास्थळावर रवाना होवुन पाहनी केली असता सदर मृतक यास पोटावर कोणत्यातरी धारदार हत्याराने मारहान करून खुन केल्याचे दिसुन आले. त्यावरून त्याचा भाऊ रमेश भाऊजी वंगणे वय 46 वर्ष रा. शिवाजी चौक, वार्ड क्र 01, विसापुर ता. बल्लारपूर याचे रिपोर्टवरून पो. स्टेशन बल्लारपूर येथे अप क्र 81/2024 कलम 302, 452 भां.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. मृतकाला दारूचे व्यसन जडले होते तसेच मृतक हा परिसरातील लोकांना दारू पिऊन शिवीगाळ करायचा अशी माहिती सूत्राकडून प्राप्त होत आहे व त्याच्या या सवयीमुळे परिसरातील लोक त्याच्यापासून त्रस्त होते. मृतक आणि आरोपी हे मित्र होते. दोघांच्या आपसी वादातुन हत्या झाल्याचे कळते सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक सा., मा.अप्पर पोलीस अधिक्षक सा. व उप विभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळाला भेट देवुन सदर घटनास्थळी तळ ठोकुन गुन्ह्याचे संबंधाने उपयुक्त मार्गदर्शन करून पोलिस स्टेशन बल्लारपूर व स्थानीक गुन्हे शाखा, चंद्रपुर अशी दोन पथक तयार केले. मा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर व मा. अप्पर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पो. ठाणे बल्लारपूर व स्थानीक गुन्हे शाखेचा पथकाने आरोपीबाबत कोणताही सुगावा नसताना अतिशय कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीबाबत गोपनीय माहिती काढुन 24 तासाचे आत आरोपी यास निष्पन्न करून आरोपी नामे विठ्ठल उर्फ डेनी गोसाईराव डबरे वय 37 वर्ष रा. वार्ड क्र 01, विसापुर ता. बल्लारपूर यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. सदर कामगिरी मा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार (स्थागुशा), सपोनी रमेश तळी, सपोनी विकास गायकवाड (स्थागुशा), सपोनी प्राची राजुरकर, पोउपनि वर्षा नैताम, पो.हवा रनविजय ठाकुर, पो.हवा यशवंत कुमरे, पोहवा बाबा नैताम, पो.हवा संतोष दंडेवार, पो.हवा अनुप डांगे, पो.हवा मिलींद चव्हान, पो. हवा.जमीर पठान, पो.हवा. नितेश महात्मे (स्थागुशा), श्रीनीवास वाभीटकर, प्रसेनजित डोर्लीकर, प्रकाश मडावी, प्रसाद धुलगंडे यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments