मिचाँग चक्रीवादळाचा फटका दक्षिण भारतातून बल्लारशाह मार्ग येणाऱ्या 53 एक्सप्रेस गाड्या रद्द (53 Express trains from South India to Ballarshah route canceled due to Cyclone Michong)

Vidyanshnewslive
By -
0
मिचाँग चक्रीवादळाचा फटका दक्षिण भारतातून बल्लारशाह मार्ग येणाऱ्या 53 एक्सप्रेस गाड्या रद्द (53 Express trains from South India to Ballarshah route canceled due to Cyclone Michong)
बल्लारपूर :- मिचाँग चक्रीवादळामुळे तामिळनाडू, आंध्रासह इतर दक्षिणी राज्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. चक्रीवादळ ४ डिसेंबरला सकाळी चेन्नई किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या भागात २ डिसेंबरपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे दक्षिण रेल्वेने २ ते ७ डिसेंबर या कालावधीत चेन्नईतून येणाऱ्या १४२ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द केलेल्या १४२ एक्स्प्रेस गाड्यांपैकी ५३ एक्स्प्रेस गाड्या बल्लारपूर स्थानकावरून जातात. त्यामुळे प्रवाशांना फटका बसणार आहे. शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मोबाइलवर ट्रेन रद्द झाल्याचा संदेश पाठवला. रेल्वेचे तिकीट आरक्षण काउंटर शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत उघडे राहिल्याने काही त्यानंतर रविवारी सकाळी ८ वाजतापासूनच तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे तिकीट आरक्षण काउंटरवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. त्यापैकी प्रमुख रेल्वे गाड्यांमध्ये दुरांतो एक्स्प्रेस, संघमित्रा एक्स्प्रेस, गया एक्स्प्रेस, राप्तीसागर एक्स्प्रेस, ग्रँटट्रक एक्स्प्रेस, तामिळनाडू एक्स्प्रेस, केरळ एक्स्प्रेस, मदुराई एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, गंगाकावेरी एक्स्प्रेस, चंदिगड एक्स्प्रेस, बिलासपूर एक्स्प्रेस, जयपूर एक्स्प्रेस, लखनौ एक्स्प्रेस, तिरुवेनल्ली एक्स्प्रेस, पाँडेचेरी एक्स्प्रेस, रामेश्वरम एक्स्प्रेस, अयोध्या एक्स्प्रेस, मुन्नारगुडी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बल्लारशाह मार्ग जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर शुकशुकाट दिसत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)