तीन राज्यांची सत्ता भाजपाच्या ताब्यात, आता एकच लक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याचे ! The power of three states is under the control of BJP, now the only focus is to win the 2024 Lok Sabha election !

Vidyanshnewslive
By -
0
तीन राज्यांची सत्ता भाजपाच्या ताब्यात, आता एकच लक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याचे ! The power of three states is under the control of BJP, now the only focus is to win the 2024 Lok Sabha election !
विद्याश न्युज(वृत्तसेवा) :- देशातील पाच राज्यात सुरू असलेली विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी अखेर थांबली आणि तीन डिसेंबरची प्रतिक्षा शिगेला पोहचली. तो ही दिवस उजाडला आणि निकालांचे तर्क-वितर्क देखील संपले. चार राज्यांचे निकालात मध्यप्रदेश, राजस्थान येथे अपक्षेप्रमाणे भाजपाचीच सत्ता बहुमताने आली. तर छत्तीसगड राज्य काँग्रेसकडे जाण्याऐवजी भाजपाकडेच गेल्याने चार पैकी तीन राज्यात भाजपाने सत्ता मिळविली आहे. तर केवळ तेलगंणात भाजपाला धोबीपझाड देत काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. मिझोरम मध्ये त्रिशंकू सत्ता येणार अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. या पाच राज्याच्या निवडणूका म्हणजे येणार्‍या लोकसभा निवडणूकीची रंगीत तालीम असेल असे बोलले जाते. अर्थात या चार राज्यात झालेल्या निवडणूकांचे वैशिष्ट म्हणजे तीन राज्यात भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षातच सरळ लढती झाल्या. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरिवाल यांनी पाचही राज्यांमध्ये जवळपास 200 उमेदवार उभे केले होते. परंतू एक टक्का देखील मतदान त्यांच्या उमेदवारांना न झाल्याने जवळपास सर्वच उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. एमआयएम या पक्षाला तेलंगणात सात जागा मिळविण्यात यश आले असून बीआरएस पक्षाला 41 जागांवर यश मिळाले आहे. तेलंगाणात तिहेरी लढत झाली. भाजपाला तीन राज्यात बहुमत मिळाले असले तरी काँग्रेसची परिस्थिती खुपच निराशाजनक होती असे झाले नाही. आणि भाजपाला खुप मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले असेही झाले नाही. त्यामुळे भाजपाला हरळून जाण्याचे कारण नसले तरी तोड-फोड करण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्याचा प्रश्न कोणत्याही राज्यात शिल्लक राहिला नाही  हे मात्र नक्की. या निवडणूकीमध्ये मुख्यमंत्र्यांचे चेहरे कोण असतील हे भाजपाने जाहीर केले नव्हते. तसेच काँग्रेसने देखील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार फोकस करून निवडणूक लढल्या नाहीत. परंतू काँग्रेसने निवडणूक प्रचारात महागाई आणि बेरोजगारीचा व प्रस्थापित सरकारच्या भ्रष्टाचाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उचलला. आणि मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानमध्ये अशोक गेहलोथ, तेलगंणात रेवंत रेड्डी हे चेहरे काँग्रेसने समोर ठेवले. तर भाजपाने प्रचारात भ्रष्टाचाराचा मुद्दाच प्रमुख ठेवला त्यास हिंदूत्वाचीही जोड दिली.
             तेलगंणाच्या प्रचार सभेत मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील 81 कोटी जनतेला पुढील पाच वर्ष मोफत धान्य देण्याची घोषणा केली. अर्थात सर्वच पक्षांनी मतदारांना मते मागतांना ‘रेवडी संस्कृती’चा वापर केला हे नाकारता येणार नाही. मग यात भाजपाची लाडली बहेना योजना असो की तरूणांना मोफत लॅपटॉप वाटप योजना असो या निवडणूकांचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे भाजपातर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीच संपूर्ण प्रचारात, सभांचा धडाका लावला. कुठेतरी जे.पी.नड्ड दिसले, तर काँग्रेस पक्षातर्फे राहुल गांधी, प्रियंका गांधी व अध्यक्ष मल्लीगार्जून खरगे, दिग्वीजयसिंह यांनीच प्रचाराची रणधुमाळी सांभाळली. तेलंगणा निर्मितीत दिर्घकाळ आंदोलक राहिलेले चंद्रशेखर राव यांच्या हातात असलेली सत्ता मात्र काँग्रेस पक्षाने आपल्याकडे खेचून आणली. या ठिकाणी भाजपाला केवळ आठ जागांवर समाधान मनावे लागले आहे. हे राज्य आपल्या ताब्यात येणार नाही याची खात्री असलेल्या भाजपाने तेलगंणात प्रचाराचा जोर अधिक लावला. त्याचे एकमेव कारण म्हणजे हे राज्य भाजपाला मिळाले नाही तरी चालेल परंतू ते काँग्रेसला देखील मिळू नये ही रणनिती यामागे होती. परंतू तसे झाले नाही. काँग्रेस पक्षाने तेलगंणात मिळविलेला विजय हा ‘इंडिया’ घटक पक्षांसाठी सुद्धा डोळ्यात अंजन घालणारा आहे. अर्थात या पाच राज्यातील निवडणूक निकालांचे पडसाद देशभर उमटणार आहेत. येणार्‍या चार महिन्यात लोकसभेच्या निवडणूका लागणार असून 20ते 22 जानवोरीच्या दरम्यान रl अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे. तीन राज्यातील विजयाने भाजपा आता त्याचे भांडवल करत देशभर लोकसभेच्या निवडणूकीसांठी प्रचाराचा मुद्दा बनवेल यात शंका नाही. कारण  ‘हिंदूत्व’ आणि ‘राम मंदिर’ या दोनच मुद्यांवर पून्हा 2024 च्या निवडणूका लढल्या जातील अशी शक्यता नाकारता येत नाही. याचवेळी काँग्रेस पक्ष मात्र महागाई, देशात वाढलेली बेरोजगारी, ईडी, सीबीआयच्या चुकीच्या पद्धतीने वापर करून विरोधी पक्षामध्ये निर्माण करण्यात आलेली भीती याचा मुद्दा बनवेल. शेतकर्‍यांना 2019 मध्ये दिलेली दीडपट हमीभावाचा मुद्दा काँग्रेसपक्ष उचलुन धरेल. महाराष्ट्रात असलेले ट्रिपल इंजिन सरकार आणि मराठा आरक्षणाचा गाजणारा मुद्दा आता कोणते वळण घेतो, ते सुद्धा डिसेंबर अखेर पर्यंत स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील थांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ज्यामध्ये मुंबई मनपाची निवडणूक सर्वात महत्वाची मानली जाते, या निवडणूका सुद्धा आता ताबडतोबीने लावल्या जातील का? याकडे ही अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे 7 डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यात घेतले जाणारे निर्णय सुद्धा महत्वाचे राहतील. विशेष म्हणजे कर्मचारी वर्गाची जुनी पेन्शन योजनेच्या मान्यतेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. तीन राज्यातील विजयाने भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तर काँग्रेस पक्ष मात्र यातून काही बोध घेईल अशी परिस्थिती नाही. काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर आमुलाग्र बदल झाल्याशिवाय काँग्रेस पक्षातील मरगळ दूर होईल असे वाटत नाही. जिल्ह्याध्यक्षांपासून तर महाराष्ट्र राज्याचे रिक्त असलेले प्रभारी पद ही पक्षातील शिथील कार्यपद्धतीची लक्षणे आहेत. त्यात बदल व्हावा असे कुणालाही वाटत नाही. त्यामुळे तीन राज्यातील विजयाने भाजपा पून्हा लोकसभेच्या तीनशे जागांचे लक्ष ठेवून राम मंदिराचा उद्घाटनाचा ‘ईव्हेंन्ट’ हा भारतभर इंम्पॅक्ट कसा करेल यावर भर देईल. व 2024 च्या लोकसभा निवडणुका कशा प्रकारे जिंकता येईल याकडे लक्ष लागले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)