चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसतोय, वातावरनात गारवा निर्माण झाला (Unseasonal rain is falling in Chandrapur district, hail has formed in the atmosphere )
चंद्रपूर :- जिल्ह्यात सकाळी सात वाजेपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोमवारी सकाळी पासून वातावरण ढगाळ होते. त्यानंतर सकाळी आठ वाजता पासून अवकाळी पावसाचा सुरुवात झाली. जिल्ह्यातील काही तालुक्यात विजांच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात जनजीवन विस्कळित झाले आहे. दिवाळी नंतर वातावरणात अचानक बदल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता कृषी अधिकारी यांनी वर्तवली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे थंडीचा गारवा असताना अवकाळी पावसामुळे वातावरण आणखी थंड झाले आहे. शेतात रब्बी पिके उभी आहेत. अशात पाऊस सुरू झाल्याने शेतीचे मोठे नुकसान या पावसामुळे होणार आहे. या अवकाळी पाऊसामुळे वातावरणात बदल होऊन आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या