बल्लारपूरात महात्मा फुलेना अभिवादन, महात्मा फुले हे कृतिशील समाजसुधारक - प्राचार्य डॉ. बी.डी. चव्हाण (Greetings to Mahatma Phule in Ballarpur, Mahatma Phule is a creative social reformer - Principal Dr. B.D. Chavan )

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात महात्मा फुलेना अभिवादन, महात्मा फुले हे कृतिशील समाजसुधारक - प्राचार्य डॉ. बी.डी. चव्हाण (Greetings to Mahatma Phule in Ballarpur, Mahatma Phule is a creative social reformer - Principal Dr. B.D. Chavan )

बल्लारपूर :- महात्मा जोतिबा फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली व शिक्षण घेतले. शिक्षणाशिवाय समाजात क्रांती होणार नाही हे त्यांनी हेरले. त्यामुळे त्यांनी बहुजनांच्या मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली. आपल्या जीवनात सामाजिक सुधारणा घडविण्यासाठी शाळा काढणे, जातीव्यवस्था निर्मूलन, अस्पृश्यता उद्धारासाठी कार्य व शेतकऱ्यांची गुलामगिरीतून मुक्तता आदी प्रमुख बाबींचा ध्यास घेऊन कृती केली, म्हणूनच ते बोलके सुधारक न राहता कृतिशील समाजसुधारक होते असे प्रतिपादन महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी.डी. चव्हाण यांनी केले. स्थानिक महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले म. फुलेंनी मानवी कल्याणाच्या अनेक सुधारणा केल्यात. त्यांची चळवळ ही समतेची चळवळ होती. या चळवळीला त्यांनी पूर्णतः वाहून घेतले होते. म्हणूनच महात्मा फुले यांचे जीवन व कार्य या देशातील तमाम शेतकरी, शोषित, पीडित व बहुजन समाजाला अर्पित आहे. कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रकाश मेश्राम यांनी तर आभार प्रा. दिवाकर मोहितकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. रोशन साखरकर, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, श्री. अशोक गर्गेलवर, श्री. सिद्धार्थ मोरे, श्री. श्यामराव दरेकर , श्री. विशाल पारधी प्रामुख्याने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज ), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)