छत्रपती संभाजी राजांची बुद्धीवादी शिकवण म्हणजे " बुध्दभूषण " हा ग्रंथ होय. - नागेश मोरे. (The intellectual teaching of Chhatrapati Sambhaji Raja is the book "Buddha Bhushan". - Nagesh More.)

Vidyanshnewslive
By -
0
छत्रपती संभाजी राजांची बुद्धीवादी शिकवण म्हणजे " बुध्दभूषण " हा ग्रंथ होय.  - नागेश मोरे. (The intellectual teaching of Chhatrapati Sambhaji Raja is the book "Buddha Bhushan".  - Nagesh More.)
वृत्तसेवा :- सकलशास्त्र विचारशील, धर्मज्ञ, इतिहास पुरुष, भाषा पंडित, ज्ञानार्जनाची जबरदस्त इच्छाशक्ती व बहुभाषा ज्ञानी असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले हे मानवतावादी तत्त्वज्ञान, महामानवा प्रति कृतज्ञता, श्रम संस्कृतीचा आदर, शासन-प्रशासनातच नाही तर संगीत, कला, साहित्य आणि अनेक भाषेतही तरबेज असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे भोसले यांची विद्यार्थ्यांसाठीची बुद्धीवादी शिकवण म्हणजे "बुध्दभूषण " हा ग्रंथ होय असे मत नागेश भास्कर मोरे यांनी व्यक्त केले. चला कवितेच्या बनात या चळवळीअंतर्गत चालू असलेल्या सातत्यपूर्ण वाचक संवादाचे 301 वे पुष्प हे विशेष बालवाचक संवाद म्हणून कुमार नागेश भास्करराव मोरे या विद्यार्थ्यांने गुंफले. त्यांनी छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला संस्कृत ग्रंथ ज्याचे मराठी अनुवाद डॉ. प्रभाकर ताकवले यांनी केले आहे अशा " बुध्दभूषण " यावर संवाद साधला. प्रसिद्ध वक्ते प्रदीप ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संवादात पुढे बोलताना संवादक मोरे म्हणाले कि " बुध्दभूषण " हे खास विद्यार्थ्यांचे सर्वांगीन व्यक्तिमत्व घडविणारे ग्रंथ असून यात संभाजीराजे यांचे विचार साध्या सोप्या भाषेत मांडलेले आहेत. साक्षरानी सरस बनले पाहिजे , नम्र बनले पाहिजे. उद्धटपणाचा त्याग केला पाहिजे. त्याशिवाय काही प्राप्त करता येत नाही.  सर्वांशी संवाद साधताना क्षमा हा गुण बाळगला पाहिजे. आपल्या कामावर भक्ती ठेवली पाहिजे. आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांनी स्वतःची वेगळी ओळख करून दिली पाहिजे. हे सांगतानाच बुध म्हणजे ज्ञान (शहाणपण) - भूषण म्हणजे दागिना त्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी समाजात बुधभूषण बनला पाहिजे या गोष्टी पटवून देताना या ग्रंथातील अनेक संस्कृत श्लोकाचे संदर्भ जोडत अनेक साधुसंतांची उदाहरणे देऊन अत्यंत उच्च प्रतीचा संवाद साधला. यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात मोरे यांनी अत्यंत सहज पणे उत्तरे दिली. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना प्रदीप ढगे म्हणाले की अत्यंत सर्वगुणसंपन्न असलेला राजकीय, सामाजिक, धार्मिक, भौगोलिक, साहित्यिक, तांत्रिक, शास्त्रीय आणि भाषिक अशा विविध विषयात संपन्न असलेला कुलवंत राजा छत्रपती संभाजी राजा यांचे विचार प्रत्येकाने समजून घ्यायचे असतील तर बुधभूषण हा ग्रंथ जरूर वाचावा. या कार्यक्रमाचे संचालन आनंद बिरादार यांनी केले. संवादकांचा परिचय प्रा.राजपाल पाटील यांनी करून दिला तर आभार राम तुकाराम धुमाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम यांनी परिश्रम घेतले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)