आम आदमी पार्टीच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनी एकता की मशाल महोत्सव, शहरातील गणमान्य प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार (Ekta Ki Mashal Mahotsav on 26th November Constitution Day on behalf of Aam Aadmi Party felicitated distinguished citizens of the city )

Vidyanshnewslive
By -
0

आम आदमी पार्टीच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनी एकता की मशाल महोत्सव, शहरातील गणमान्य प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार (Ekta Ki Mashal Mahotsav on 26th November Constitution Day on behalf of Aam Aadmi Party felicitated distinguished citizens of the city )


बल्लारपूर :- २६ नोव्हेंबर रोजी शहरात आम आदमी पक्षातर्फे सलग तिसऱ्यांदा संविधान दिन आणि पक्ष स्थापना दिवस शगुन लॉन समोरील खुल्या मैदानात आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजावे या उद्देशाने ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आर्टिकल हस्तलेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत आहे.ज्यामध्ये संविधानातील कोणत्याही एका कलमाचे सिग्नेचर पेपरवर विद्यार्थ्यांना प्रस्तुतिकरण करावे लागणार आहे. तसेच २६ नोव्हेंबर रोजो कार्यक्रमाची सुरूवात नगरपरिषद चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मानवंदना करून जनतेत ऐक्य भावना रुजविण्याच्या उद्देशाने नगर परिषद जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून कार्यक्रम स्थळापर्यंत ढोल ताशांच्या गजरात तसेच जय भीम जय संविधानच्या जयघोषात मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. ही मशाल म्हणजे सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी एकता कि मशाल व हा महोत्सव म्हणजे एकता की मशाल महोत्सव असणार आहे. या महोत्सवात घटम वादक तेजस खरात व १५ वर्षीय सप्त खंजेरीवादक कीर्तनकार तुलसी हिवरे यांच्या संविधान प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. संविधान दिनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच २७ नोव्हेंबर ला आम आदमी पक्षातर्फे शहरातील कला मंदीर जवळील राजे बल्लाळशाह नाट्यगृहात सत्कार समारोह देखील आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये शहरातील पत्रकार, गुणवंत विद्यार्थी, निस्वार्थ सामाजिक कार्य करणारे नागरिक अश्या अनेक गणमान्य व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास पक्षाचे गुजरातमधील नेते व महाराष्ट्र सह प्रभारी गोपाल इटालिया, राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे महाराष्ट्र राज्य, ज्येष्ठ नेते रंगा राचुरे, राज्य समिति सदस्य डॉ. देवेंद्र वानखेड़े, राज्य संगठन मंत्री भूषण ढाकुलकर, विदर्भाचे माजी कोषाध्यक्ष जगजीत सिंह तसेच जिल्हा कार्यकारिणी, जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच शहर कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित असणार आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)