पोलीस ठाणे बल्लारपूर आणि ग्रामपंचायत जुनोना यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जुनोना येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात जादूटोणाविरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले.जादूटोणाच्या संशयावरून गावातील दोन कुटुंबात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सदर प्रबोधनसभेत आणि जिल्हा संघटक अनिल दहागावकर , जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदीसह अंधश्रद्धांशी निगडित भूत,भानामती,तंत्र- मंत्र,जादूटोणा, करणी,बुवाबाजी आदि विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी याप्रसंगी विविध घटनांचे दाखले देऊन गावकऱ्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुवा बाबा,मांत्रिकांच्या नादी न लागण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत चे सरपंच विवेक शेंडे पोलीस उपनिरीक्षक रासकर उपसरपंच किशोर कोडापे यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सरपंच विवेक शेंडे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पोलीस ठाणे बल्लारपूर आणि ग्रामपंचायत जुनोना चे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
शीर्षक नाही
By -
११/०२/२०२३ ०४:३४:०० PM
0

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या