9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन, युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन (Organization of Namo Maharojgar Melayo in Nagpur on 9th and 10th December, appeal to youths to benefit )

Vidyanshnewslive
By -
0
9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन, युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन (Organization of Namo Maharojgar Melayo in Nagpur on 9th and 10th December, appeal to youths to benefit )
चंद्रपूर :- कौशल्य विकास, रोजगार व नावीन्यता विभागाअंतर्गत नागपूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर मेळाव्याचे आयोजन दि. 9 व 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जमनालाल बजाज, प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रसाद लोढा आदींची उपस्थिती असणार आहे. तसेच  या मेळाव्यामध्ये 200 आस्थापनांचे स्टॉल असणार आहेत. जिल्ह्यातील उद्योजकांनी     https://Rojgar.mahaswayam.gov.in या विभागाच्या पोर्टलवर जागा अपलोड कराव्यात. उमेदवारांनी मेळाव्याकरीता येताना आधार कार्ड, शैक्षणिक अहर्ताच्या प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या मेळाव्यामध्ये जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज ), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)