6 डिसेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जप्त केलेल्या 36 वाहनांचा लिलाव Auction of 36 seized vehicles at Regional Transport Office on December 6

Vidyanshnewslive
By -
0
6 डिसेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जप्त केलेल्या 36 वाहनांचा लिलाव Auction of 36 seized vehicles at Regional Transport Office on December 6

चंद्रपूर :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे मोटार वाहन कर कायदा 1958 मधील विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा महाराष्ट्र जमीन महसूल कर संहिता 1966 नुसार, आहे त्या स्थितीत जाहीर लिलाव करण्यात येत आहे. दि. 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे लिलावाद्वारे 36 वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे. लिलावामध्ये विक्री करावयाच्या वाहनांची यादी, लिलावाचा दिनांक, ठिकाण तसेच अटी व आदी माहिती विभागाच्या www.eauction.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहीर ई-लिलावामध्ये भाग घेणाऱ्यांनी दि. 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदाराकडे डीएससी असणे आवश्यक असेल. ऑनलाइन सादर केलेल्या मूळ कागदपत्रासह ऑनलाइन फॉर्म, अटी व शर्ती स्वीकृती अर्ज साक्षांकन करून लिलावात भाग घेण्याकरीता 2 हजार रुपये नोंदणी शुल्क व खबरदारी ठेव रक्कम रुपये 99 हजार डी.डी.द्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर या नावाने रिझर्व बँकेच्या नियमाच्या सिटीएस मानांकनाप्रमाणे दि. 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 दरम्यान, सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयात जमा करून ऑफलाईन नोंदणी, पडताळणी व अप्रोवलसाठी कागदपत्रे सादर करावीत. त्यानंतरच ई- लिलावात सहभागी होता येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)