बल्लारपुरात विविध विकास कामाचं पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन (Guardian Minister for various development work in Ballarpur. Bhoomipujan by Sudhirbhau Mungantiwar)
बल्लारपूर :- विकासपुरुष म्हणून प्रचलित असलेले व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आज बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा दौरा असून या दरम्यान आज बल्लारपूर शहरात विविध विकास कामांचं भूमिपूजन व पायाभरणी सोहळा संपन्न होत आहे या अंतर्गत गौरक्षण वॉर्डातील स्पोर्ट कॉम्प्लेक्सचा विकास व सौदर्यीकरण, डॉ. झाकीर हुसेन वॉर्डातील वैशाली चौक ते डॉ.ए.पि.जे.अब्दुल कलाम चौक पर्यत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम, बल्लारपूर शहरातील नगर परिषद प्रशासकीय भवनाचा भूमिपूजन ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न होत आहे तरी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन मा. विशाल वाघ, प्रशासक व मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर व मा. मुकेश टांगले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 2 चंद्रपूर यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या