कुशल मनाच्या एकाग्रतेतुन जीवनाचे धेय्य गाठता येते ! - धम्मचारी श्रमणमित्र The goal of life can be achieved through the concentration of skilled mind! - Dhammachari Sramanamitra

Vidyanshnewslive
By -
0

कुशल मनाच्या एकाग्रतेतुन जीवनाचे धेय्य गाठता येते ! - धम्मचारी श्रमणमित्र The goal of life can be achieved through the concentration of skilled mind!  - Dhammachari Sramanamitra

बल्लारपूर :- भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार, बल्लारपुर येथे बाल धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी श्रमणमित्र, नागपुर यांनी केले. " कुशल मनाच्या एकाग्रतेतुन जीवनाचे धेय्य गाठता येते." कुठल्याही समस्येवर मात करता येते आणि हेच बुद्ध धम्म शिकवितो. तेव्हा विद्यार्थी व युवकानी बुद्ध विचारांचा आणि ध्यानाचा अवलंब करावा" असे प्रतिपादन केले. शिबिरात खेळांच्या माध्यमातून मनाची एकाग्रता कशी साधायची हे सांगितले.

आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आणि अभिनयाने मुलांना 4 तास खिळवून ठेवले. सुरुवातीस त्रिशरण पंचशील, मराठीतून पंचशील यथार्थ खोब्रागडे, विधायक शील हृदया रामटेके यांनी घेतले. धम्ममीत्र भास्कर भगत , धम्ममित्र संपत कोरडे, अशोक दुपारे, तूलशीदास खैरे, जयदास भगत, नरेंद्र जाणगे, यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिति होती. कार्य सांगता धम्मपालन गाथेने झाली.

संपादक :- दिपक चरणदास भगत. (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)