महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात अग्नीवीरांचा सत्कार (Firefighters felicitated at Mahatma Jyotiba Phule College)
बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मध्ये अग्नीवीरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण तर मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर उपस्थित होते. तसेच अन्य मान्यवर ज्यात आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ. रजत मंडल कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. दिवाकर मोहितकर आणि लेफ्टनंट योगेश टेकाडे हे मंचावर उपस्थित होते. भारतीय सेनेतील अग्निवीरांच्या दुसऱ्या तुकडीमध्ये महाविद्यालयातील एनसीसीचे पहिल्यांदा च एकाच वेळी पाच छात्र सैनिकांची निवड झाली. त्यात हरीश घुले, करण झरकर, महेश ढवले, लोकेश वडस्कर आणि रौनक शर्मा यांची निवड झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. चव्हाण, डॉ. रजत मंडल श्री दिवाकर मोहितकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सर्व अग्निविरांचे कौतुक करून प्रेमाची थाप दिली. तसेच मुख्य अतिथी श्री. संजय भाऊ कायरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अग्नीवीर साठी निवड झालेल्यांना छात्र सैनिकांना शुभेच्छा दिल्या आणि इतर कॅडेट्स ने सुध्दा त्यांचे अनुकरण करून पुढे जावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट योगेश टेकाडे यांनी केले ज्यात त्यांनी महाविद्यालया तील एसीसी चे कॅडेट्स कशा प्रकारे परिश्रम घेतात तसेच विविध क्षेत्रात मध्ये यावर्षी 13 कॅडेट्स ला नोकरी लागली. एनसीसी विभागाने महाविद्यालयाचा मान वाढविला यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात कार्पोरेल पायल कुंदलवार आणि सर्जेन्ट दिक्षा एलमूलवार यांनी स्वलिखित कवितेचे वाचन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील छात्र सैनिक, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्पोरेल पायल कुंदलवार आणि आभार प्रदर्शन सर्जेन्ट दिक्षा एलमूलवार यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या