विसापूर ग्रामपंचायत लोकार्पण सोहळ्यादरम्यान फर्निचरसाठी निधी देण्याचे वचन, ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी सेवा केंद्र म्हणून कार्य करावे - ना.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

Vidyanshnewslive
By -
0

विसापूर ग्रामपंचायत लोकार्पण सोहळ्यादरम्यान फर्निचरसाठी निधी देण्याचे वचन, ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी सेवा केंद्र म्हणून कार्य करावे - ना.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन Visapur Gram Panchayat pledges funds for furniture during inauguration ceremony, Gram Panchayat should act as service center for citizens - Assertion by Na. Sudhir Mungantiwar

विसापूर : ग्रामपंचायत भवन बांधकामांसाठी एक कोटी रुपये मंजूर केले. नवनिर्मित इमारतीच्या माध्यमातून गावाकऱ्यांची कामे सुलभ व्हावी. कामासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान व्हावे. आवश्यक सुविधा उपलब्ध व्हावी. आता नवनिर्मित ग्रामपंचायत भावनाचे लोकार्पण झाले. मात्र आवश्यक फर्निचर जुने आहे. अधिकाऱ्यांनी सौर ऊर्जा यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा व फर्निचर साठी प्रस्ताव सादर करा. मी त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देणार आहे. ग्रामपंचायतीने सर्वसमावेशक नागरिकांसाठी सेवा केंद्र म्हणून कार्य करावे,असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विसापूर येथे केले. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील ग्रामपंचायत नवीन इमारतीचे लोकार्पण समारंभ पार पडला. ना.सुधीर मुनगंटीवार हे अर्थ मंत्री असताना ग्रामपंचायत भवन बांधकामांसाठी एक कोटी रुपये मंजूर केले होते. त्या इमारतीचे उदघाटन ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष किशोर पंदिलवार, सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, तहसीलदार डा.कांचन जगताप, संवर्ग विकास अधिकारी अनिरुद्ध वाळके , सत्कारमुर्ती सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चंद्रपूर, कार्यकारी अभियंता मुकेशकुमार टांगले, बल्लारपूर उपविभागाचे उपाभियंता संजोग मेंढे, शाखा अभियंता वैभव जोशी, चंद्रपूरचे कंत्राटदार राहुल मानकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते फलक अनावरण करून व नवनिर्मित ग्रामपंचायत भावनाचे फित कापून उदघाट्न करण्यात आले. यावेळी ना.मुनगंटीवार म्हणाले, ग्रामपंचायत भवनाची नवीन इमारत गावाचे नावलौकिक वाढविणारे प्रतिबिंब आहे. इमारत तर पूर्ण झाली. पण काही सुविधा अपूर्ण आहेत. या ठिकाणी नवीन फर्निचरची गरज आहे. अख्खी ग्रामपंचायत वातानुकुलित झाली पाहिजे. विजेची बचत करण्यासाठी सौर यंत्रणा या ठिकाणी बसविण्यात यावी.यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने माझ्याकडे प्रस्ताव सादर करा. तो मी मंजूर करून ही इमारत कामासाठी येणाऱ्यांना आनंददायक वाटली पाहिजे. सरपंच व उपसरपंच यांनी लोकांशी संवाद करताना अडचण जाणार नाही. समन्व्यातून गाव विकासाची संकल्पना पूर्ण करा. ग्रामपंचायत म्हणजे सेवा केंद्र असल्याची प्रतिमा रुजवा, असेही ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ग्रामपंचायत मार्फत सन्मानचिन्ह, शाल , श्रीफळ व पुष्पगुछ प्रदान करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. दरम्यान ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यकारी अभियंता मुकेशकुमार टांगले, उपाभियंता संजोग मेंढे, शाखा अभियंता वैभव जोशी व बांधकाम कंत्राटदार राहुल मानकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुछ व सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन लिपिक संतोष निपुंगे यांनी केले ,तर आभार प्रदर्शन उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रीना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, सुवर्णा कुसराम, सरोज केकति, दिलदार जयकर, संदीप काकडे, सुरेखा इटनकर, शशिकला जीवने, सुनील रोंगे, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.  यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्तिथी होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)