बतुकम्मा देवी उत्सव समितीतर्फे वर्धा नदीच्या संपवेल घाटावर बतुकम्मा सद्दुला उत्सव साजरा Batukamma Saddula Utsav celebration at Sampavel Ghat of Wardha river by Batukamma Devi Utsav Committee

Vidyanshnewslive
By -
0

बतुकम्मा देवी उत्सव समितीतर्फे वर्धा नदीच्या संपवेल घाटावर बतुकम्मा सद्दुला उत्सव साजरा Batukamma Saddula Utsav celebration at Sampavel Ghat of Wardha river by Batukamma Devi Utsav Committee

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील वधा॔ नदीचा गणपती विसर्जन घाट, संपवेल पंप मैदान किल्ला वार्ड येथे बतुकम्मा देवी उत्सव समितीच्या वतीने बतुकम्मा सद्दुला उत्सव 22/10/2023 रोजी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार (वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री) म्हणाले की बतुकम्मा देवी उत्सव समितीने आयोजित केलेल्या बतुकम्मा देवी सद्दुला उत्सवानिमित्त त्यांनी सर्व तेलुगू समाज व विविध संस्थांना बतुकम्मा सद्दुला सण आणि नवरात्री देवीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमास श्री हरीश शर्मा   माजी नगराध्यक्ष  व भाजपा जिल्हाध्यक्ष, जेष्ट नेते श्री समीर केने, श्री येल्लाय्या दसारप, श्री आशीष देवतळे उपस्थित होते. बतुकम्मा देवीची पूजा करण्यासाठी, सर्व महिला, पुरुष आणि मुलांनी आपल्या बतुकम्मा देवीला नदीच्या काठावर ठेवले आणि बतुकम्मा देवी सद्दुला उत्सवाच्या स्तुतीमध्ये आनंदाने आणि स्तुतीने गीते गायली. यावेळी क्रिस्टल वाटर व हाइजीन वॉटर तर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेलुगू समाजातील महिला व विविध संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बतुकम्मा देवी उत्सव समितीचे अध्यक्ष मनोहर दोतपेल्ली यांनी सर्वांना नवरात्रीच्या बतुकम्मा देवी सद्दुला पांडुगा व विजय दशमी च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.  समितीचे रवी अनुसारी (उपाध्यक्ष), शांती कुमार गिरमिल्ला (सचिव), कनकय्या गांगुला, किसन देवराज, राजकुमार मुत्यालवार, प्रभाकर कनकुटला, गोपाल रेड्डी, राजन्ना इरुगुराला, प्रकाश दोतपेल्ली, विनोद दासरवार, मनीष रामिल्ला, महेंद्र रेड्डी, कृष्णा नमसानी, स्वामी रायबराम, श्रीनिवासन चेरकुतोटा, अ‍ॅड.किशोर पुसलवार, गणेश सिलगमवार, राकेश अंबाला, लक्ष्मण कनकुटला, श्रीकांत निर्वटला, संदीप पेरका, प्रेमकुमार तरला, संजय घुगलोत, दिलीप तांड्रा  कुमार पुसलवार, रामू मेदरवार, श्रीकांत आंबेकर, लखपति घुगलोत, श्रीधर गुंडेटी,नारायण सुक्का, श्रीनिवासन मद्दीकुंटा, श्रीनिवासन पिसार, साई कुमार पुसलवार, कुमार सुनकु, नागेश मंथेनी, अजय चिटकला यांनी यशस्वी प्रयत्न केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)