जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गांधीजींचे विचार जिवंत राहतील - प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण As long as humanity lives, Gandhiji's thoughts will live on - Prof. Dr. Badalshah Chavan

Vidyanshnewslive
By -
0

जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गांधीजींचे विचार जिवंत राहतील - प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण As long as humanity lives, Gandhiji's thoughts will live on - Prof.  Dr.  Badalshah Chavan

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा फुले महाविद्यालयात विविध उपक्रमातून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली एनसीसी च्या विद्यार्थ्यांद्वारे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले. तर ग्रंथालय विभागाच्या वतीने गांधीजींच्या व शास्त्रीजीच्या जीवनावर आधारित ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. तर राष्ट्रीय सेवा योजना द्वारे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण, प्रा. डॉ. रोशन फुलकर, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. ले. योगेश टेकाडे, वरिष्ठ लिपिक प्रकाश मेश्राम इ ची विचार पिठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. 


        यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना स्वच्छतेचे महत्व स्पष्ट करून ग्रामीण विकासावर भर दिला, अध्यक्षीय स्थानावरून मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की, " जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंत गांधीजींचे विचार जिवंत राहतील. महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने ओळखले जाते त्याच प्रमाणे भारत देश गांधी -आंबेडकराच्या विचाराने ओळखले जाते. महात्मा गांधीजीची ' खेड्याकडे चला ही संकल्पना आजही ग्रामीण विकासाला अधोरेखित करते तर शास्त्रीजीचा ' जय जवान जय किसान ' च्या नाऱ्याला जय विज्ञान च्या जोडीने खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताचा विकास घडवता येईल. " कार्यक्रमाचं संचालन प्रा. डॉ. रोशन फुलकर, तर आभार प्रदर्शन प्रा. ललित गेडाम यांनी केले यावेळी प्रा. डॉ. किशोर चौरे, प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. डॉ. पंकज कावरे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. डॉ. रजत मंडल, प्रा. रोशन साखरकर, प्रा. ललित गेडाम,  प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)