एड.योगिता रायपुरे यांना उत्कृष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी गौरव पुरस्कार प्रदान, गोंडवाणा विद्यापीठाने केले सन्मानित... Adv. Yogita Raipure was awarded the Outstanding College Staff Award, Gondwana University honored...

Vidyanshnewslive
By -
0

एड.योगिता रायपुरे यांना उत्कृष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी गौरव पुरस्कार प्रदान, गोंडवाणा विद्यापीठाने केले सन्मानित... Adv. Yogita Raipure was awarded the Outstanding College Staff Award, Gondwana University honored...

चंद्रपूर -: पुरोगामी साहित्य संसद च्या विदर्भ अध्यक्षा तथा पुरोगामी पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा कायदेशीर सल्लागार एड.योगिता प्रकाश रायपूरे यांचा उत्कृष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नुकताच गौरव करण्यात आला. ऍड.रायपूरे चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात कार्यरत असून, त्यांचे शैक्षणिक, साहित्य, समाजिक क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे. महत्वाचे म्हणजे विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या महिला महाविद्यालयीन कर्मचारी आहेत. दिनांक २ आक्टोबर रोजी विद्यापीठाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराजा सेलिब्रेशन गडचिरोली येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन् गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित, अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तर मंचावर प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, जीवन साधना गौरव पुरस्काराचे मानकरी डॉ. सतीश गोगुलवार, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, डॉ. चंद्रमोली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

              या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान हा पुरस्कार मिळवून जनता महाविद्यालय चंद्रपूर चे नाव उंचावल्या बाबत महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ एम. सुभाष व प्रबंधक श्री दिनकर अडबाले यांचे हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला ऍड.योगिता रायपूरे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी, साहित्य संसदेचे पदाधिकारी, सोशल एज्यूकेशन मुव्हमेंट तसेच लर्न टू एज्यूकेट फोरम इत्यादी समाजिक संघटनेच्या वतीने तसेच जनता महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. या पुरस्काराकरीता त्यांनी त्यांचे कुटुंबीय, महाविद्यालयातील सहकारी, व सामाजिक शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील सर्व मित्र मैत्रीणींना याचे श्रेय दिले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)