महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात गांधी आणि शास्त्रीजी च्या जयंती वर राष्ट्रीय छात्र सैनिकां द्वारे स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण द्वारे अभिवादन (Mahatma Jyotiba Phule College salutes Gandhi and Shastriji on birth anniversary by Swachhta Mission and Tree Plantation by National Student Soldiers)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात गांधी आणि शास्त्रीजी च्या जयंती वर राष्ट्रीय छात्र सैनिकां द्वारे स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण द्वारे अभिवादन (Mahatma Jyotiba Phule College salutes Gandhi and Shastriji on birth anniversary by Swachhta Mission and Tree Plantation by National Student Soldiers)

बल्लारपूर :- महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मध्ये महात्मा गांधी जयंती निमित्य स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत एक घंटा एक तारीख या निमित्य स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. भारत सरकार द्वारे एक तारीख एक घंटा हा कार्यक्रम 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा कर्नल समीक घोष यांच्या मार्गदर्शन अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ले. योगेश टेकाडे यांच्या नेतृत्वात एनसीसी विभागाद्वारे राबविण्यात आला. या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना च्या कॅडेट्स नी महाविद्यालयीन परिसर तसेच शिवाजी वॉर्ड परिसरात  स्वच्छता अभियान राबविन्यात आला. या स्वच्छता अभियानात महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कॅडेट्स यांनी सहभाग नोंदविला. या अभियानात एनसीसीच्या 40 कॅडेट्सनी स्वच्छता दूत म्हणून परिसर स्वच्छ केला. तसेच महाविद्यालय परिसरामध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रा सविता पवार मैडम यांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. महाविद्यालय  ग्रंथालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ग्रंथ प्रदर्शनी भरविण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट योगेश टेकाडे,  डॉ. पंकज कावरे, डॉ. कायरकर, डॉ. फुलकर डॉ. मंडल डॉ. बोरकर, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. बोबडे, प्रा. नंदूरकर, प्रा. भगत, प्रा. माकोडे आणि एनसीसी च्या सर्व कॅडेट्स यांनी अथक परिश्रम घेतले

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)