प्रा. सुनील कामडे यांना "डॉक्टरेट " बहाल. नवभारत कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सत्कार संपन्न. Prof. Sunil Kamde awarded "Doctorate" by Gondwana University. Awarded by Navbharat Junior College.

Vidyanshnewslive
By -
0

प्रा. सुनील कामडे  यांना "डॉक्टरेट " बहाल. नवभारत कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सत्कार संपन्न. Prof. Sunil Kamde awarded "Doctorate" by Gondwana University. Awarded by Navbharat Junior College.

मूल :-स्थानिक नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र  या विषयाचे प्रा.सुनील नारायण कामडे यांना नुकतीच गोंडवाना विद्यापिठाने प्रतिष्टेची " डाक्टरेट " ही पदवी बहाल केली आहे. प्रा. सुनील कामडे  यांनी " इन्फलूअन्स ऑफ सबस्टीट्युशन आन स्ट्रक्चरल  मॅग्नेटीक  इलेक्ट्रिकल्स प्रॉपर्टीस ऑफ स्ट्रॉंटियम नानोसाईझ हेक्सागोनल फेराईटस " या भौतिकशास्त्रीय विषयावर आपला शोधप्रबंध गोंडवाना विद्यापिठाला सादर केला होता. याना नाविण्यपूर्ण शोधप्रबंधा करिता मार्गदर्शक म्हणून आंबेडकर महाविद्यालय नागपूर चे डॉ. किशोर रेतकर व राजीव गांधी अभियांत्रिकी महा. चंदपूर चे डॉ. पी. जी. अगोणी, यांनी सहकार्य केले. नवभारत  कनिष्ट विज्ञान महाविद्यालयात  डॉ. सुनील कामडी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. प्राचार्य अशोक झाडे यांचे हस्ते शाल,श्रीफळ देवून व पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रा. महेश पानसे, प्रा. किसन वासाडे, प्रा. पुस्तोडे, प्रा. संजय येरोजवार, प्रा. प़भाकर धोटे, प्रा. हरिष येलमूले, प्रा. विनोद बोलिवार,  प्रा. कु.उगेमुगे, प्रा. सौ.वैरागडे सह शिक्षक सहकारी उपस्थीत होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)