मान्यताप्राप्त 211 मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाची यादी प्रसिद्ध List of proposed reorganization of approved 211 polling stations published

Vidyanshnewslive
By -
0

मान्यताप्राप्त 211 मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाची यादी प्रसिद्ध List of proposed reorganization of approved 211 polling stations published

चंद्रपूर :- 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने, पूर्व पुनरीक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून,भारत निवडणूक आयोगाच्या  निर्देशानुसार 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्राच्या नावातील बदलाचे 137, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे 54 तसेच मर्ज करण्यात आलेल्या 9 मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान केंद्रावरील 1500 मतदारापेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्राच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणारे 11 मतदान केंद्र असे एकूण 211 मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेचे प्रस्ताव 3 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फतीने भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आले. सदर 211 मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने 18 ऑक्टोबर 2023 रोजी मान्यता दिली असल्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. तरी सदर मान्यताप्राप्त 211 मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाची यादी 19 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)