बल्लारपुरात सर्पमित्राच्या मदतीने 2 अजगर प्रजातीच्या सापाना जीवदान, बल्लारपूर वनपरीक्षेत्रात केले निसर्गमुक्त ! (In Ballarpur, with the help of a snake charmer, 2 snakes of the python species were saved, freed from nature in the Ballarpur forest area !)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरात सर्पमित्राच्या मदतीने 2 अजगर प्रजातीच्या  सापाना जीवदान, बल्लारपूर वनपरीक्षेत्रात केले निसर्गमुक्त ! (In Ballarpur, with the help of a snake charmer, 2 snakes of the python species were saved, freed from nature in the Ballarpur forest area !)

बल्लारपूर :- दिनांक 28 आक्टोंबर 2023 ला बल्हारपुर शहरातील पंडीत दिनदयाल वार्ड येथील रहिवासी श्री. शेरा सुर्यवंशी यांचे राहते घरी विशाल अजगर साप असल्याची माहिती श्री नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. माहिती प्राप्त होताच बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कर्मचारी हे मौका स्थळी तात्काळ हजर झाले व सर्पमित्र श्री ओम प्रकाश चव्हाण व श्री. सुनील जयस्वाल यांचे मदतीने अजगर या प्रजातीचे सापाला पकडुन बल्हारशाह नियतक्षेत्रातील वनखंड क्रमांक 493 मध्ये निसर्ग मुक्त करण्यात आले. रेस्क्यु करण्यात आलेला अजगर हा 13 फुट लांबीचा होता. याकामी श्री. के. एन. घुगलोत, क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह, श्री. एस. एम. बोकडे, वनरक्षक बल्हारशाह, श्री. नितेश बावणे, सर्पमित्र श्री ओम प्रकाश चव्हाण व श्री. सुनील जयस्वाल यांनी परिश्रम घेतले त्यामुळे अजगर या सापाला नविन जिवनदान मिळाले व त्याला वनात निसर्ग मुक्त करण्यात आले.

        दिनांक 27 आक्टोंबर 2023 ला मौजा केम तुकुम गावा लगतील श्री. विठ्ठल बाबुराव कुळमेथे यांचे शेतात अजगर साप दिसुन आला. त्याला सर्पमित्र अखिल लभाने याचा मदतिने पकडुन वनखंड क्रमांक 496 देव बोडी परीसरात निसर्ग मुक्त करण्यात आले. रेस्क्यु करण्यात आलेला अजगर हा 6 फुट लांबीचा होता. याकामी सपमित्र अखिल लभाने, कु. उषा ए. घोडवे, नियत वनरक्षक केम, कु.बी.पि. तिवाडे, नियत वनरक्षक लावारी 2 व PRT टिम, केम तुकुम यांनी परिश्रम घेतले त्यामुळे अजगर या सापाला नविन जिवनदान मिळाले व त्याला वनात निसर्ग मुक्त करण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)