बल्लारपूर पेपर मिलच्या बॉयलर मध्ये कामगार भाजला, दिगांबर अजाबराव महाजन यांचा उपचारा दरम्यान मृत्यू व्यवस्थापन व प्रशासनाच्या चर्चेदरम्यान मृतकाच्या वारसांना मोबदला व मुलांच्या शिक्षण खर्च मिळणार Digambar Ajabrao Mahajan Digambar Burned in Ballarpur Paper Mill Boiler Dies During Treatment During the discussion of management and administration, the heirs of the deceased will get compensation and education expenses of the children

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर पेपर मिलच्या बॉयलर मध्ये कामगार भाजला, दिगांबर अजाबराव महाजन यांचा उपचारा दरम्यान मृत्यू व्यवस्थापन व प्रशासनाच्या चर्चेदरम्यान मृतकाच्या वारसांना मोबदला व मुलांच्या शिक्षण खर्च मिळणार  Digambar Ajabrao Mahajan Digambar Burned in Ballarpur Paper Mill Boiler Dies During Treatment During the discussion of management and administration, the heirs of the deceased will get compensation and education expenses of the children

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील नावाजलेली उद्योग कंपनी म्हणजे बल्लारपूर पेपर मिल मात्र याच बल्लारपूर पेपर मिल उद्योगात काम करणारा कामगार सुरक्षा व्यवस्थे अभावी मृत्युमुखी पडला प्राप्त माहितीनुसार पेपरमिल मध्ये काम करणारा कर्मचारी मृतक दिगंबर अजबराव महाजन (46) वर्ष रा. किल्ला वाड॔, बल्लारपूर दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळ च्या शिफ्ट मध्ये एक वाजता दरम्यान काम करीत असताना दिगंबर महाजन हा चार फूट खोल गरम  केमिकल युक्त पाणी मध्ये पडल्यामुळ अपघात झाला होता, त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळं दिनांक 25 रोजी सकाळी चंद्रपूर येथून नागपूरला हलवण्यात आले पण आज नागपुरात त्याचा मृत्यू झाला. कामगार दिगंबर महाजन मिल मध्ये अपघात झाला होता तेव्हा बल्लारपूर पेपर मिल प्रशासनाने या  अपघाताची पोलीस स्टेशनला  तक्रार दिली नसल्याची माहिती मिळत आहे. बल्लारपूर पेपर मिल मध्ये अपघातात तो बॉयलर मध्ये  पडल्याने मृतकाचे कंबर पर्यंत केमिकल युक्त (ऍसिडयुक्त) पाण्यात भाजला गेला. कुठलेही सुरक्षा देत नसून कामगारांना धोकादायक ठिकाणी काम करायला मजबूर करतात एखाद्या कामगाराने काम करण्यास नकार दिला तर कामावरून कमी करण्याची धमकी देतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे एका  कामगाराने मिलच्या  व्यवस्थापन मुळे आत्महत्या केली. आणि मृत्यू पूर्व (सुसाईड नोट) लिहून गेला होता, दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. येथील कामगाराचा आरोप आहे की  मिल मध्ये सिविल काम चालू आहे आणि त्याकरिता गड्डा खोदला गेला पण गड्डा चा भोवताल कोणतेही सुरक्षा कवच लावल्या गेले नाही आणि त्या खड्यात केमिकल युक्त गरम पाणी चे साठवण करतात पण काही दिवस  पावसाळ्यात असल्याने पाऊस पडत असल्याने वरच्या पाऊसचे पाणी खड्यात पडत असल्याने खड्यात ले पाणी चे तापमान कमी झाले नाहीतर तिथेही कामगार दिगंबर महाजनचा जागेवर मृत्यू झाला असता, हे सर्व सेफ्टी चे अधिकारी याचे मुळे झाल्याचा आरोप करीत आहे. नुकसान भरपाईसाठी कुटुंबीय कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडून बसले होते. ४० लाख नुकसान भरपाई, पत्नीला नोकरी, मुलांचे पूर्ण शिक्षण देण्याची  मागणी करीत मृतदेह गेटसमोर ठेवण्यात आले होते. मागण्या वर ठाम कायम राहून मृतदेह दोन ते अडीच घंटे गेट समोर ठेवून आंदोलन केले. नंतर प्रशासन, पेपर मिल व्यवस्थापन व नातेवाईक यांची बैठक बोलावली. त्यात उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, तहसीलदार कांचन जगताप, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, ॲड मेघा भाले, पत्रकार अजय दुबे, पत्रकार देवेंद्र आर्य, सुरज ठाकरे, पेपर मिल युनियन चे तारा सिंग, विरेंद्र आर्य, पवन मेश्राम, दीवसे व बिल्ट चे अधिकारी उपस्थित होते. त्यात मृतक च्या पत्नी ला २६ दिवस ठेकेदारी दवाखान्यात काम, मुलांना १० पर्यंत शिक्षण खर्च, पेन्शन योजना व १५ लाख आर्थिक मदत मिळणार आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)