26 सप्टेंबर रोजी दिव्यांगाच्या दारी अभियान, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन (Dari Abhiyan of Divyanga on September 26, district administration appeals to maximum number of beneficiaries to attend)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- जिल्हा प्रशासन,  तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाना शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ व वितरण कार्यक्रम दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता शकुंतला लॉन (फार्म), विद्यानिकेतन शाळेसमोर, नागपुर रोड, चंद्रपुर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू उपस्थित राहणार आहे. यावेळी दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल लावले जाणार आहेत.  दिव्यांग बांधवांनी  जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)