महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे राष्ट्राला समर्पित विद्यार्थी घडविणे होय - प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण Celebrating National Service Scheme Day at Mahatma Jyotiba Phule College, National Service Scheme is about making students dedicated to the nation - Prof. Dr. Badalshah Chavan

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे राष्ट्राला समर्पित विद्यार्थी घडविणे होय - प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण Celebrating National Service Scheme Day at Mahatma Jyotiba Phule College, National Service Scheme is about making students dedicated to the nation - Prof.  Dr.  Badalshah Chavan

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. स्वप्नील बोबडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, प्रा. डॉ. रोशन फुलकर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख, प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे, सहकार्यक्रम अधिकारी रासेयो, उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या पुष्प गुच्छ देऊन झाली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रा.डॉ. रोशन फुलकर यांनी व्यक्त करतांना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विद्यार्थ्यांचा अंगी असलेले गुण व कौशल्याचा विकास घडविणे होय कोरोना काळ वगळता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने  वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्या याकाळात ग्राम स्वछता योजना राबविण्यात आली. 

      यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय पदावरून मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे राष्ट्राला समर्पित विद्यार्थी घडविणे होय तसेच या योजनेत काम करतांना "मी ऐवजी आम्ही" याभावनेतून विदयार्थी काम करतात. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाने राष्ट्राचा विकास व्हावा या उदात्त हेतूने 1969 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्थापना केली तेव्हापासून 24 सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा दिन म्हणून साजरा केला जातो खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास राष्ट्रीय सेवा योंजनेद्वारे राबविण्यात येणाऱ्या शिबिरातून होतो. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. स्वप्नील बोबडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केल. कार्यक्रमाचं संचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी एलिना व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे यांनी केले. यावेळी प्रा.डॉ. किशोर चौरे, प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. डॉ. पंकज कावरे, प्रा.डॉ. रजत मंडल, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रध्दा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)