शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकाच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य रुग्णांचे काय ? रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा आंदोलन करू, झोडे यांचा इशारा (Not only nurses are safe in government medical college, but what about common patients? Provide facilities to patients otherwise we will protest, warns Raju Zode)

Vidyanshnewslive
By -
0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकाच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य रुग्णांचे काय ? रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा आंदोलन करू, झोडे यांचा इशारा (Not only nurses are safe in government medical college, but what about common patients?  Provide facilities to patients otherwise we will protest, warns Raju Zode)

चंद्रपूर :- चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपुर जिल्ह्यासह यवतमाळ, गडचिरोली तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र याच रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू असून अनेक मशीन बंद अवस्थेत पडले आहेत. तर स्ट्रेचर, व्हेंटिलेटर, औषध व डॉक्टरांचा मोठ्या तुटवडा असून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नुकतेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे एका परिचरिकेला आपला जीव गमवावा लागला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकाच सुरक्षित नाही तर येथे येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांचे काय? असा सवाल राजू झोडे यांनी उपस्थित केला असून रुग्णालयातील आरोग्य सेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा आंदोलन करू असा गंभीर इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली आणि तेलंगणा राज्यातील ग्रामीण भागातील अनेक गरीब आणि गरजू रुग्ण कमी खर्चात उपचार व्हावे, यासाठी येथे भरती होत असतात. मात्र, येथील रुग्णालयात योग्य उपचार सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसांना उपचार न मिळणे ही नित्याचीच बाब झाली असताना याच रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला जीव गमवावा लागला, हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा पुरावा आहे. इतरांची काळजी घेण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या एका परिचारिकेला जीव गमवावा लागतो, यासारखी लाजिरवाणी घटना नाही. रुग्णालयात काम करणारी परीचारीकाच सुरक्षित नाही तर सामान्य रुग्णांचे काय? असा सवाल देखील राजू झोडे यांनी उपस्थित केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे सत्ताधाऱ्याचे लक्ष नाही, पालकमंत्री आढावा घेत नाहीत. वैद्यकीय अधिकारी कोणालाच जुमानत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसांच्या आरोग्याचे हाल होत आहे. रुग्णांची दुर्दशा ही चिंतेची बाब असून या घटनेची आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करावी, जिल्हा रुग्णालयात औषध साठा उपलब्ध करून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)