ताडोबा जंगल सफारीच्या ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली 12 कोटींची फसवणूक, 2 व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल (12 crore fraud in the name of online booking of Tadoba Jungle Safari, case registered against 2 persons)

Vidyanshnewslive
By -
0

ताडोबा जंगल सफारीच्या ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली 12 कोटींची फसवणूक, 2 व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल (12 crore fraud in the name of online booking of Tadoba Jungle Safari, case registered against 2 persons)

चंद्रपूर :- ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली सरकारची १२ कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात रामनगर पोलिसांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्राप्त झाली असून ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकिंग करू शकते. २०२० ते २०२३ या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंग अंतर्गत २२ कोटी २० लाख एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे जमा करायची होती, मात्र या कंपनीने केवळ १० कोटी जमा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने ताडोबा व्यवस्थापनाला १२ कोटी १५ लाख ५० हजारांनी गंडा घातला आहे. चार वर्षांच्या लेखापरीक्षणानंतर ही बाब समोर आली. सरकारी पैशांची उधळपट्टी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. ताडोबा अंधारी अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी सचिन उत्तम शिंदे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, ताडोबा जंगल सफारीसाठी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन नावाच्या कंपनीमध्ये ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत करार करण्यात आला. ही कंपनी चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन भावांची आहे. पोलिसांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही उच्चभ्रू कुटुंब असलेल्या चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील प्लॉट क्रमांक ६४ येथील रहिवासी आहेत. या संदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेन्द्र रामगावकर यांना विचारले असता प्रकरण न्यायालयात आहे. तरीही वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनी विरुद्ध कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)