अन त्या १२ रुग्णांना कॅन्सर चा "आउटडोअर " गवसला. "महाआरोग्यम " शिबीराची फलश्रुती And those 12 patients got "outdoor" cancer. Outcome of "MahaArogyam" camp

Vidyanshnewslive
By -
0

अन त्या १२ रुग्णांना  कॅन्सर चा "आउटडोअर " गवसला. "महाआरोग्यम " शिबीराची फलश्रुती And those 12 patients got "outdoor" cancer.  Outcome of "MahaArogyam" camp

मूल :- रुग्णसेवेचे व्रत तितकेसे सहज नसते. अनेक सेवाभावी संस्था, मंडळे, किंवा राजकिय व्यासपिठावरून  रुग्णसेवेचा प्रयोग केला जातो आणी व्हायला हवा. मात्र या प्रयोगाची यतार्थता रोगांचा "आऊटडोअर" किती ? यावरूच मोजता येईल. मूल शहरातील् आरोग्य मेळाव्यातून तिन हजारावर शहरी, ग्रामीण जनतेने हजेरी लावली. व्याप्ती, नियोजन आणी सुशृषा बघता हा महाआरोग्यम मेळावाच ठरला. आयोजकांचे श्रम साफल्य झाले. या आरोग्य  मेळाव्याची सर्वात मोठी यथार्थता जर कुठली असेल तर ती म्हणजे तालुक्यातील नविन १२ कॅन्सरग्रस्त रुग्णांची झालेली ओळख व लगेच भविष्यात यावर होणाऱ्या उपचाराची सोय.̊ यात राज्याचे विरोधी पक्षनेता विजय भाऊ वडेट्टीवार  यांच्या संकल्पनेतून तयार झालेले फिरते रूग्णालय व कॅन्सर निदान केंद्र व या फिरत्या निदान केंद्रात कार्यरत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयात सामील तज्ञांनी १२ कॅन्सर रुग्णांना हुडकून पुढील  उपचारासाठी "आऊटडोअर " उपलब्ध  करून दिला. हे जरी खरे असले तरी मॉ दुर्गा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा चंदपूर जिल्हा मध्यवतीं  बँकेचे अध्यक्ष संतोषभाऊ रावत व तालुका काँग्रेस कमेटी ने घेतलेला पुढाकार या कॅन्सर रुग्णांना दीर्घकाल जग दाखविणारा ठरणार आहे. या स्मरणीय आरोग्य सेवेचा लाभ घेणारे ग्रामीण, गरीब नागरिक होते. १२ नवनिदान होणाऱ्या कॅन्सर रुग्णासोबत ११४ जुन्या कॅन्सर रुग्णांना सुद्धा यामुळे या खर्चिक रोगाशी दोन हात करण्याची हिम्मत येणार आहे. एकून १२६  रुग्णाना कॅन्सर वर मात करण्यासाठी "आऊटडोअर" गवसला ही या महा आरोग्यंम मेळाव्याचे खऱ्या अर्थाने सार्थकता आहे. 12 नविन कॅन्सर रुग्णामध्ये, मूल शहरातील ३,बेंबाळ २,बोंडाळा(बुज)  २,गोवर्धन १,वाघोली १,चिचाळा १,उथळपेठ १,राजोली १ असे रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांना तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय नागपूर येथे मोफत उपचारासाठी लगेच सेवा मिळणार आहे. खऱ्या अर्थाने हेच खरे महत्कार्य. कारण योग्य उपचाराअभावी गरीब रुग्ण व परिवार जणांना किती आर्थिक, शारीरिक, मानसिक फटका बसतो याची कल्पना करता येत नाही. या आरोग्य मेळाव्यातून कॅन्सरसाठी "आऊटडोअर" उपलब्ध झाला ही आयोजकाच्या सार्वजनिक, राजकीय, सामाजीक कर्तृत्वाची "मेरीट" आहे म्हणावे लागेल. १२६ कॅन्सर रुग्णांचे जगण्याचे स्वप्न जागविणे ही कित्येक धर्मस्थळ बांधण्यापेक्षा मोठे व पुण्याचे कार्य होय.

संकलन :- प्रा. महेश पानसे, पूर्व विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज ), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)